आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Put Up Huge Hoarding Outside Sena Bhavan, Showing BJP Leaders Bowing Head Before Balasaheb.

शिवसेनेचे पोस्टर: ढोंगी व अहंकारी मोदी कधीकाळी बाळासाहेबांसमोर झुकायचे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दादरमधील सेना भवनासमोर लावण्यात आलेले पोस्टर. - Divya Marathi
दादरमधील सेना भवनासमोर लावण्यात आलेले पोस्टर.

मुंबई- शिवसेना-भाजपात पुन्हा एकदा जोरदार संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत. विसरले ते दिवस कसे हे, की ढोंग वरकरणी, झुकल्या होत्या यांच्या गर्विष्ठ माना साहेबांच्या चरणी...! अशी कविता लिहित भाजपला डिवचले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्यसह सर्व बड्या नेत्यांना बाळासाहेब ठाकरेंसमोर झुकल्याचे दाखविले आहे. दादरमधील सेना भवनासमोर लावलेले हे पोस्टर पोलिसांनी तीन तासानंतर काढून टाकले. हे पोस्टर शिवसैनिकांनी लावले आहे, पक्षाने आदेश दिला नव्हता. यात शिवसैनिकांच्या भावना आहेत. पक्षाचा याच्याशी संबंध नाही असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे तसेच सेनेमुळेच भाजपचे राज्यात अस्तित्त्व होते व आहे हे दाखवून दिल्याचे सांगण्यात येत आहे. विसरले ते दिवस कसे हे, की ढोंग वरकरणी, झुकल्या होत्या यांच्या गर्विष्ठ माना साहेबांच्या चरणी…!अशा प्रकारची पोस्टरबाजी करीत शिवसेनेने भाजपवर बोचरी टीका केली आहे. दरम्यान, हे पोस्टर काढण्यावरून मुंबई पोलिस आणि शिवसैनिकांत वाद पेटला आहे. नेत्यांचा अवमान करणारे पोस्टर काढून टाका अशी विनंती पोलिस शिवसैनिकांना करीत आहेत. मात्र, पोलिसांनी आधी मुंबईतील अनधिकृत पोस्टर काढावीत मग आम्हाला सल्ला द्यावा असे सांगत पोस्टर काढण्यास साफ नकार दिला.

जे भाजपचे नेते कधीकाळी बाळासाहेबांसमोर नतमस्तक होत होते ते नेते आता मागचे दिवस विचरलेले दिसत आहेत. बाळासाहेबांसमोर यांच्या गर्विष्ठ माना झुकल्या होत्या की ते ढोंग होते असा सवाल करीत भाजपच्या सर्व बड्या नेत्यांची पोस्टरवर फोटो लावले आहेत. याचसोबत शरद पवार, राज ठाकरे, नारायण राणे, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आदी इतर पक्षांतील नेत्यांचीही छायाचित्रे पोस्टरवर लावली आहेत. नरेंद्र मोदी बाळासाहेबांसमोर कसे झुकले होते हा फोटो मध्यभागी लावला आहे तसेच त्याची साईज जास्त ठेवली आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, राजनाथ सिंह या सर्व बड्या भाजपच्या नेत्यांची बाळासाहेबांसमवेतची छायाचित्रे दाखवून त्यांच्या चरणी कसे लीन होत होते हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तेच हे भाजपचे नेते आता ते दिवस कसे विसरले असा अर्थ त्यातून निघत आहे.
आताचे निमित्त कल्याण-डोंबिवली निवडणुकीचे...
भाजप आणि शिवसेनेतील यावेळी वाद उफाळून येण्याचे निमित्त ठरले आहे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक. सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेना जोरदार दसरा मेळावा घेणार आहे. गुरुवारच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करावे व भाजपला योग्य संदेश देण्याबरोबरच या सर्वाचा शिवसेनेला कल्याण-डोंबिवली निवडणुकीत फायदा व्हावा असे यामागे गणित आहे. या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता संदेश देणार याकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष असेल. साहजिकच उद्धव यांच्या निशाण्यावर यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी नसून भाजप व मोदीच राहणार असल्याचे स्पष्ट आहे.
या महापालिकेत शिवसेनेची मागील काही वर्षे सत्ता आहे. आजपर्यंत येथे भाजपने शिवसेनेला साथ दिली होती. त्यामुळे सेना सत्तेत येत होती. मात्र, भाजपने फारकत घेऊन स्वतंत्र निवडणूक घेण्याचे ठरविले व शिवसेनेचे माथे फडकले. ज्या भाजपला आम्ही बोटाला धरून मोठे केले तोच पक्ष आता आम्हाला वाकडे दाखवत आहे हे शिवसेनेला सहन होत नाहीये. याआधीही विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी 25 वर्षाची युती तोडून शिवसेनेचा घात केला होता. त्यानंतर सत्ता वाटपातही शिवसेनेला 25 टक्केही वाटा दिला नाही. त्यामुळे शिवसेनेने आजपर्यंत भाजपला केंद्रात व राज्यात मनापासून साथ दिली मात्र सत्ता मिळताच भाजपने सेनेलाच संपविण्याचा विडा उचलल्याने शिवसेनेचा वाघ पिसाळला आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारला जेवढे अडचणीत आणता येईल तेवढा प्रयत्न शिवसेनेकडून होताना दिसत आहे.
पुढे पाहा, यापूर्वीही मोदींवर पोस्टरमधून शिवसेनेने साधला होता निशाणा...