आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉट्सअपवरील आक्षेपार्ह मजकुराची होणार चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - व्हॉट्सअपद्वारे लोकप्रतिनिधींच्या विरोधात वादग्रस्त छायाचित्रे व टिपण्णी करणा-यांवर आता सरकारची करडी नजर राहणार आहे. असे मजकूर व छायाचित्रांची सरकार चौकशी करणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत सांगितले.
गुरुवारी विधानसभेत अजित पवार यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे व्हॉट्सअपवर येणा-या या वादग्रस्त मजकुरांकडे सरकारचे लक्ष वेधले. सोशल मीडियातून विधानसभेतील सभासदांच्या बाबतीत अपमानकारक मजकूर टाकला जात आहे. असे करणा-यांची चौकशी करण्यासाठी नियम करा, अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर कदम यांनी हे उत्तर दिले.

अजित पवार यांच्या मागणीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाठिंबा दिला. ते म्हणाले, व्हॉट्सअपवर आमदारांच्या मृत्यूची बातमी पसरविणा-यांविरोधात सायबर क्राईमद्वारे कारवाई करण्यात यावी. विरोधकांच्या या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन अध्यक्षांनी चौकशीचे निर्देश दिले. त्यावर रामदास कदम यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.