आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्यांच्या निवृत्तीचे वय ६५, शिक्षकांचे साठ- मंत्रिमंडळाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उच्चतंत्र शिक्षण क्षेत्रातील अध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून हे वय ६० वर्षे करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाने घेतला अाहे. तसेच प्राचार्यांच्या निवृत्तीचे वय सरसकट ६५ वर्षे करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

उच्च शिक्षण क्षेत्रातील शासकीय संस्था, तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नित तंत्र महाविद्यालये, पदविका संस्था महाविद्यालयांमधील अध्यापकांच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात अाला. तसेच अकृषी विद्यापीठे, तंत्रशास्त्र विद्यापीठे संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक, ग्रंथपाल, उपग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल तसेच संचालक, उपसंचालक सहायक संचालक, शारीरिक शिक्षण यांच्या सेवानिवृत्तीचे वयही ६० वर्षेच असेल. यापूर्वी निवृत्तीसाठी ६२ वर्षांपर्यंत मुदत देण्यात अालेले कर्मचारी मुदतवाढीच्या दिनांकासच सेवानिवृत्त होतील.
बातम्या आणखी आहेत...