मुंबई- मी मुसलमान असल्यामुळेच मला माझ्या वक्तव्यांवरून सध्या 'टार्गेट' केले जात आहे, असा आरोप अभिनेते नासिरुद्दीन शाह यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान याला जर मी महान म्हटले तर सुनील गावसकर यांच्या मोठेपणाला बाधा कुठे पोहोचते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर बॉलिवूडमधील आणखी एक दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी पाकविरोधी भूमिका घेतली आहे.
पाकिस्तानात कार्यक्रम करण्यासाठी मी अनेक वेळा व्हिसासाठी अर्ज केला होता, पण तो सतत फेटाळण्यात आला, अशी प्रतिक्रिया अनुपम खेर यांनी व्यक्त केली. सुधींद्र कुलकर्णी, तुमच्या बायको-मुलीची छेड शेजा-याने काढली तर त्या शेजा-याला तुम्ही घरी चहा प्यायला आणि मेजवानी झोडायला बोलवाल काय, असा सवाल विचारत अनुपम खेर यांनी पाकिस्तानविरोधी सूर आवळला.
गायक अभिजित भट्टाचार्य याने खेर यांच्या सूरात सूर मिसळत भारतीय कलाकार असताना पाकिस्तानी कलाकार हवेतच कशाला. आपले कलाकार इमानेइतबारे आयकर भरतात, पाकिस्तानी कलाकार तर हवालामार्गे पैसे घेतात, अशी टीका केली आहे.
पुढे विस्ताराने वाचा, नसिरूद्दीन शहा, अनुपम खेर आणि अभिजित भट्टाचार्य यांनी काय काय म्हटले आहे....