आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभा डेने आता केला सचिनवर टि्वटिवाट, रिओ ऑलिम्पिकच्या वेळीही निर्माण केला हाेता वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळाडू सुमार प्रदर्शन करत असताना लेखिका शोभा डेने टि्वट करून वादाला जन्म घातला होता. शोभा डेच्या त्या टि्वटनंतर तिच्यावर सर्वत्र जोरदार टीका झाली.

मात्र, आता शोभा डे पुन्हा एकदा आपल्या िट्वटमुळे चर्चेत आली आहे. आता तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर नेम साधला आहे. सचिन रिओत भारतीय संघाचा गुडविल अॅम्बेसेडर होता. दोन दिवसांपूर्वीच सचिनने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, जिम्नॅस्टिकच्या फायनलमध्ये चौथ्या स्थानी आलेली दीपा कर्माकर आणि सिंधूचे कोच पुलेला गोपीचंद यांना बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून दिली. या बीएमडब्ल्यू कारबाबत शोभा डेने िट्वटिवाट केला आहे. शोभा डे म्हणाली, “माझा एक छोटा मात्र क्लेशदायक वाटणारा योग्य प्रश्न आहे. खेळाडूंना देण्यात आलेल्या या बीएमडब्ल्यू कारचे पैसे सचिन तेंडुलकरने स्वत: दिले आहेत काय? बीएमडब्ल्यू गाड्यांची ही चांगली जाहिरात आहे. इतक्या महागड्या गाड्या चालवण्याचा खर्च कोण देईल? या महागड्या गाड्या खेळाडूंसाठी पांढरा हत्ती ठरू नयेत म्हणजे झाले,’ असे ट्विट शोभा डेने केले आहे. यापुर्वी, रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या सहभागावर शाेभा डेने चुकीचा टिव्ट करीन अापल्यावर राेष अाेढावून घेतला हाेता.
बातम्या आणखी आहेत...