आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Students Require Income Certificate For The Educational Admission

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी आता उत्पन्नाचा दाखला हवाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी यापुढे केवळ नॉनक्रीमिलेयर प्रमाणपत्र गृहीत न धरता उत्पन्नाचेही प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. राज्याच्या सामाजिक न्यायविभागाने नुकतेच याबाबतचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

शासकीय, विनाअनुदानित व कायम अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जाती-जमाती, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करतेवेळी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्नदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न र्मयादेची अट नाही, परंतु उर्वरित मागास विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी सरकारने साडेचार लाख रुपये उत्पन्न र्मयादेची अट घातली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न लक्षात घेणे आवश्यक असताना काही जिल्ह्यांत फक्त नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्राच्या आधारे या योजनेचा लाभ दिला जात असल्याचे निदश्रनास आले. त्यानंतर केवळ नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्राचा आधार न घेता पालकांचे वार्षिक उत्पन्नदेखील विचारात घेण्यात यावे, अशा सूचना विभागाने संबंधितांना जारी केल्या आहेत.


नियमात बदल कशासाठी?
राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न विचारात न घेता केवळ नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्राच्या आधारे शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार निदश्रनास आल्यानंतर त्याला अटकाव घालण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने नुकतेच यासंदर्भात परिपत्रक काढून उत्पन्नाचे प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे.