मुंबई - शीना बोरा हत्याकांडात अटकेत असलेल्या प्रत्येक आरोपीकडून वेगळा खुलासा होत आहे. अटकेत असलेल्या तीन आरोपींपैकी ड्रायव्हर श्यामवर रायचा दावा आहे, की शीना तिची आई इंद्राणीला ब्लॅकमेल करत होती. शीनाला मुंबईमधील वांद्रे पश्चिम येथे एक थ्री-बीएचके फ्लॅट हवा होता. त्यासाठी ती आई इंद्राणीला सतावत होती. ड्रायव्हरने त्याच्या जबाबात सांगितले, की जेव्हा इंद्राणी शीनाचा गळा दाबत होती तेव्हा ती परत-परत म्हणत होती, 'आता घे वांद्र्यात थ्री-बीएचके फ्लॅट.' शीनाची 24 एप्रिल 2012 रोजी वांद्र्यतच गळादाबून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी कारमध्ये इंद्राणी आणि तिचा दुसरा पती संजवी खन्ना आणि ड्रायव्हर होता.
काय म्हणाला ड्रायव्हर
ड्रायव्हरने त्याच्या जबाबात म्हटले, शीनाचा कारमध्ये गळा दाबताना इंद्राणी हिंसक झाली होती. ड्रायव्हरने या प्रकरणात कमी शिक्षा होईल यासाठी, माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. त्याने खार पोलिसांकडे त्याचा जबाब नोंदवला आहे.
का हवा होता फ्लॅट ?
शीनाला इंद्राणीचे सर्व सत्य माहित होते. त्यामुळे ती आईला ब्लॅकमेल करत होती. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीत हे समोर आले आहे की शीना इंद्राणीला ब्लॅकमेल करत होती. इंद्राणीचा मुलगा मिखाइल, पती पीटर मुखर्जी आणि पीटरचा मुलगा राहुल यांच्या चौकशीतही हेच तत्थ्य समोर आले होते. ती इंद्राणीला धमकी देत होती की पीटरसमोर एक सीक्रेट लेटर उघड करेल. जेव्हा इंद्राणीने तिला तसे करण्यापासून थांबवले तेव्हा तिने तोंड बंद ठेवण्यासाठी थ्री-बीएचके फ्लॅटची मागणी केली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की जेव्हा शीनाने सांगितले की मी राहुलसोबत लग्न करणार आहे तेव्हा इंद्राणी परेशान झाली. तिने अनेक वेळा राहुल पासून तिला वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र शीना इंद्राणीला धमकी देत होती की ती पीटर समोर एक्सपोज करेल. वास्तविक पीटरला राहुल आणि शीनाच्या नात्याबद्दल अडचण नव्हती.
हत्येचे दुसरे काय कारण असू शकते ?
पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात हत्येचे दुसरे कारण हे पीटरची संपत्ती असण्याची शक्यता आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, की इंद्राणीच्या मनात भीती होती की जर शीना आणि राहुलचे लग्न झाले तर संपत्तीवरील आपला कंट्रोल कमी होईल. दुसरीकडे मिखाइल इंद्राणीला त्रास देत होता.