आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now The Nationalist Congresss\'leadership To Supriya Sule

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे भावी नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘अजून आमच्या पक्षाचे नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे देण्याची वेळ आली नाही,’ असा टोला लगावला होता. ‘या वक्तव्यातून पवारांनी काँग्रेसवर बोचरी टीका तर केलीच, शिवाय राष्ट्रवादीचे भविष्यातील नेतृत्व मात्र सुप्रिया सुळेंकडे जाणार असल्याचे संकेत दिले,’ अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

पवारांच्या या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये काहीशी नाराजी पसरली असली तरी याविषयी जाहीर प्रतिक्रिया द्यायची नाही, अशी भूमिका त्यांनी सध्या तरी घेतली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते, तर पक्षातीलच दुस-या गटातून सुप्रिया यांच्याकडे हा ‘वारसा’ सोपवण्याबाबत मागणी होत आहे.पक्षातील बहुसंख्य आमदार हे अजित पवार यांचे नेतृत्व मानतात. मात्र, गेल्या वर्षी राष्ट्रवादीने युवती काँग्रेसच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व राज्यभर पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
सुप्रिया याच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतील, अशीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली होती. इतकेच नव्हे तर अजित पवार आणि सुप्रिया यांची वारंवार तुलना राजकीय विश्लेषक आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून होत राहिली तरी अंतिम निर्णय शरद पवारांचाच असेल हेसुद्धा सर्व ओळखून आहेत.