आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी गेलेल्या तृप्ती देसाईंना विरोध; आंदोलन न करताच परतल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर येथील यशस्वी आंदोलनानंतर हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी गुरुवारी मुंबईत आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना मुस्लिम समाजातून जाेरदार विराेध झाल्यामुळे आंदोलन गुंडाळावे लागले.

हाजी अली दर्ग्यातील मझारपर्यंत जाण्यास महिलांना असलेल्या बंदीविरोधात हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येणार होते. मात्र त्यासाठी पोलिसांनी दिलेली वेळ टळून गेल्यामुळे तसेच मुस्लिम समाजातील काही संघटनांनी विरोध केल्याने देसाईंनी गाडीतून न उतरता आल्यापावली परत जाणेच पसंत केले.

हाजी अली दर्गा परिसरात आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी तृप्ती देसाई यांना संध्याकाळी पाचपर्यंतच परवानगी दिली होती. मात्र देसाई या पाचनंतर पोहोचल्यामुळे आंदोलन न करताच त्यांना परतावे लागले. ‘आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत. याला शाहरुख, सलमान आणि आमिर खान या कलावंतांनीही पाठिंबा द्यावा,’ असे आवाहनही देसाई यांनी केले हाेते. दरम्यान, विरोध करण्यासाठी अबू आझमी आणि त्यांचे कार्यकर्ते या वेळी हजर होते. तर एआयएमआयएम आणि आम विकास पार्टी या पक्षांचे कार्यकर्तेही जमले हाेते.

देसाईंना ताब्यात घेतले
तीव्र विराेधामुळे दर्ग्यात जाऊ न शकलेल्या तृप्तींनी नंतर महिला कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानाकडे कूच केली. मात्र तिथेही पाेलिसांनी त्यांना राेखून ताब्यात घेतले. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा अापण दर्ग्यासमाेर अांदाेलन करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

महिला प्रवेश चुकीचा
>इस्लाममध्ये दर्गा किंवा कब्रस्तानात महिलांनी प्रवेश करण्यास मनाई आहे. त्यामुळे हाजी अलीमध्येही महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.
- मौलाना डॉ. रशीद मदनी, अरबी भाषा विभागप्रमुख, सर सय्यद महाविद्यालय
हाजी अली दर्गा परिसरात सुरक्षेत वाढ-
- तृप्ती देसाई यांनी सांयंकाऴी काही पुरोगामी मुस्लिम संघटनेच्या महिलांसमवेत हाजी अली दर्ग्याबाहेर औपचारिक आंदोलन केले.
- तृप्ती देसाई यांनी आजचे आंदोलन दर्ग्याबाहेरच होईल असे सांगितले आहे. तसेच आज आम्ही मजारापर्यंत जाणार नाही असे म्हटले आहे.
- असे असले तरी तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाला शिवसेनेचे नेते हाजी अराफत शेख यांच्यासह एमआयएमने विरोध केला आहे.
- तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यातील मजारापर्यंत घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चप्पलेचा प्रसाद देऊ असा इशारा अराफत यांनी दिला होता तर एमआयएने तृप्ती देसाईंनी काळं फासू अशी धमकी दिली आहे.
- त्यामुळे आज संभाव्य होणारा राडा रोखण्यासाठी पोलिसांनी हाजी अली दर्गा परिसरात बंदोबस्त ठेवला आहे.
- आज सकाळपासून दर्ग्याकडे जाणा-या रस्त्यावर बॅरिकेड्स लावली आहेत.
खान मंडळींना तृप्तीचे आवाहन-
- हाजी अली दर्ग्यात मुस्लिम महिलांना प्रवेश न देण्याबाबत तृप्ती देसाई यांनी बॉलिवुडमधील तीन खान स्टार्स आपली भूमिका मांडण्याचे आवाहन केले आहे.
- देसाई यांचे म्हणणे आहे की, हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश बंदी आहे याबाबत सलमान, शाहरुख आणि आमिर खानला काय वाटते व त्यांचे काय म्हणणे आहे याचा खूप परिणाम होऊ शकतो.
- तृप्ती म्हणाल्या, हे तीन खान देशात लोकप्रिय आहेत त्यांची फॅन फॉलोइंग खूप आहेत. जर त्यांनी आपली भूमिका मांडली तर त्याचा मुस्लिम समाजात खूप मोठा व सकारात्मक प्रभाव पडेल.
- त्यामुळे या खान मंडळींना मी आवाहन करते की, यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया द्यावी.
- या प्रकारामुळे तृप्ती देसाई यांनी खान मंडळींवर नैतिक दबाव आणल्याचे बोलले जात आहे.
मोहन भागवतांना लिहले पत्र-
- तृप्ती देसाई यांनी आपण कोणत्याही धर्माच्या जातीच्या विरोधात नसून महिलांच्या समानतेबाबत लढत असल्याचे म्हटले आहे.
- त्यामुळे शनि शिंगणापूरातील आंदोलन यशस्वी केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आता हाजी अली दर्ग्याकडे वळविला आहे.
- याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना संधी मिळण्याबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहले आहे.
- संघात महिलांना समान संधी देण्याची मागणी करतानाच आपल्या भेटीसाठी वेळ द्यावा अशी विनंतीही देसाई यांनी केली आहे.
- तृप्ती देसाई यांनी मोहन भागवत यांना हे पत्र भूमाता ब्रिगेडच्या लेटरहेडवरून मराठीत लिहले आहे.
- तृप्तीने म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष महिलांच्या मतांमुळेच देशात व राज्यात सत्तेत आली आहे.
- त्यामुळे भाजपची मातृसंघटना असलेल्या आरएसएसमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांना संधी दिल्यास देशात समानतेचा संदेश जाईल.
पुढे वाचा, मुस्लिम महिलांचे तृप्ती देसाईंच्या विरोधात आंदोलन....