आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Whole Mumbai Can Enjoy Wi fi Service, Mtnl Leads Towords

संपूर्ण मुंबई लवकरच Wi-Fi ने कनेक्ट होणार; एमटीएनएलचे पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सरकारी कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) आता लवकरच संपूर्ण मुंबईत शहरात वाय-फाय सेवा पुरविणार आहे. अर्थात ही सेवा मोफत नसली तरी माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईतील मोक्याची ठिकाणे, मुंबई विमानतळ, सर्व रेल्वे स्टेशन्स, मोनो व मेट्रो मार्गावरील परिसर, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस याचबरोबर रहिवाशी कॉलनीज व कार्यालयातही ही सेवा पुरविणार असल्याचे एमटीएनएलने जाहीर केले आहे.
एमटीएनएल कंपनीने मुंबई व दिल्लीतील आपल्या ग्राहकांना रोमिंग फ्री सेवेला प्रारंभ केला. त्यामुळे एमटीएनएलच्या ग्राहकांना सर्व इनकमिंग कॉल्सवर एकही पैसा मोजावा लागणार नाही. मुंबई व दिल्लीत एमटीएनएलचे पाच लाख ग्राहक आहेत.
एमटीएनएलच्या रोमिंग फ्री कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या हस्ते शुक्रवारी पवईत झाले. याच वेळी एमटीएनएलच्या वतीने येत्या वर्षभरात मुंबईत वायफाय योजनेला सुरूवात करणार असल्याचं जाहीर करण्यात आले. कपिल सिब्बल यांनी एमटीएनएलच्या या प्रस्तावाचे स्वागत केले. तसेच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या एमटीएनएलला भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या कंपनीत विलिन करण्याची योजना असल्याचे जाहीर केले. दूरसंचार क्षेत्रातील गळेकापू स्पर्धेला तोंड देण्यासाठी एमटीएनएलने सज्ज व्हावे. सध्याच्या डिजीटल युगात स्मार्टफोन आणि त्यामाध्यमातून होणाऱ्या सोशल नेटवर्किंगचे महत्व वाढत चालले आहे. या हातभार देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासही होणार असल्याचे सिब्बल यांनी सांगितले.