आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NSEL Online Trading Fraud, Jignesh Shah Arrest Mumbai

5 हजार 600 कोटींच्या एनएसईएल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी जिग्नेश शहाला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऑनलाईन ट्रेडिंगच्या आधारे नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (एनएसईएल)ने केलेल्या तब्बल 5 हजार 600 रूपये कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कंपनीचे प्रवर्तक आणि अध्यक्ष जिग्नेश शहा यांच्यासह मुख्य वित्तीय अधिकारी श्रीकांत जावलगेकर यांना अटक केली आहे. एनएसईएल घोटाळ्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून घोटाळ्यातील 5 हजार 100 कोटी रूपयांची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे.
एनएसईएलचे प्रवर्तक आणि फायन्साशियल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष जिग्नेश शहा यांनी कंपनीला 5600 कोटींची तूट होत असल्याचे जाहीर केल्यानंतर कंपनीमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार गुतंवणूकदारांनी केली होती. या कंपनीत सुमारे 13 हजार गुंतवणूकदारांनी आपला पैसा गुंतवला आहे. गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शहा यांच्या कंपनीच्या संचालक मंडळावरील 40 अधिका-यांविरोधात फसवणूक, विश्वासघात, कट रचणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला होता.
शहा यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्याला या घोटाळ्याची माहिती नसल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. याचबरोबर त्यांना वेळोवेळी चौकशीला बोलावले असतानाही त्यांनी टाळाटाळ केली. मात्र कंपनीने वित्तीय व्यवहार कायदेशीर पद्धतीने न केल्याचे पुढे आल्याचे कळताच यात शहा यांच्या सहभागाशिवाय हे होऊ शकत नाही हा निष्कर्ष काढायला वेळ लागला नाही. त्यातच यात काळा पैसा आणि संशयास्पद पैशाची देवानघेवाण झाल्याचे दिसून आल्याने शहा यांना अटक केल्याचे अतिरिक्त आयुक्त राजवर्धन यांनी सांगितले. दरम्यान, या यांना राजकीय पाठबळ असल्याचे बोलले जाते. राज्यातील एका बड्या नेत्याची शहासोबत ऊठबस असल्याचे सांगण्यात येते.