Home »Maharashtra »Mumbai» Nsui President Suspended

नग्‍न नृत्य करणारा एनएसयूआयचा अध्‍यक्ष सुरज सिंग ठाकूर निलंबित

वृत्तसंस्‍था | May 07, 2013, 11:53 AM IST

  • नग्‍न नृत्य करणारा एनएसयूआयचा अध्‍यक्ष सुरज सिंग ठाकूर निलंबित

काँग्रेसच्या राष्ट्रीय युवक विद्यार्थी संघटनेच्या (एनएसयूआय) मुंबई विभागाचे अध्यक्ष सुरज सिंग ठाकूरला बेशिस्‍त वर्तन आणि धिंगाणा घातल्‍यावरुन निलंबित करण्‍यात आले आहे. मुंबईतील शिबिरात ठाकूरने दारू पिऊन धिंगाणा घालून अश्लिल चाळे आणि नग्न नृत्य केल्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. त्‍यानंतर काल रात्री उशीरा हा निर्णय घेण्‍यात आला.

सुरज सिंग ठाकूरची राष्ट्रीय युवक विद्यार्थी संघटनेच्या मुंबई विभागाच्‍या अध्यक्षपदी डिसेंबर 2012मध्‍ये फेरनिवड झाली होती. यापूर्वीच्‍याक कार्यकाळात त्‍याचे काम चांगले होते. परंतु, असे वर्तन त्‍याने कसे काय केले, याचेच कोडे सर्वांना पडले आहे.

Next Article

Recommended