आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात महागडा ‘न्यूक्लिअर’!, रामगाेपाल वर्माचे सीएमए ग्लोबल प्रॉडक्शन ३४० कोटी खर्च करून बनवणार आंतरराष्ट्रीय चित्रपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या काही वर्षांपासून सातत्याने फ्लॉप चित्रपट देणारा प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपल वर्मा लवकरच ‘न्यूक्लिअर’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. सीएमए ग्लोबल प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटावर तब्बल ३४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

रामूने याबाबत टि्वटवर माहिती देऊन चित्रपटाचे पोस्टरही लाँच केले आहे. रामू म्हणाला, मी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटाची निर्मिती करत असून ‘न्यूक्लिअर’ हा देशातील सर्वात महागडा चित्रपट असेल. गेल्या अनेक वर्षांपासून अणुबॉम्बविषयक प्रकरणे आपण वाचत आहोत. १९७० च्या दशकामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. आजही ही घटना आठवली की अनेकांच्या अंगावर काटा येतो. जर चुकीच्या व्यक्तीच्या हातात अण्वस्त्रे लागल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे चित्रपटात दाखवण्यात येईल, असेही तो म्हणाला. रामूचे दिग्दर्शन असलेला ‘सरकार-३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सरकारच्या भूमिकेत पाहायला मिळतील. याआधीचे ‘सरकार’ आणि ‘सरकार राज’ हे चित्रपट हिट झाले होते.
रामूला हिटची अपेक्षा
दिग्दर्शक म्हणून रामगोपाल वर्मा याने पदार्पणातच ‘शिवा’सारखा हिट चित्रपट दिला होता. त्यानंतर “रात’,‘रंगीला’, ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘भूत’, ‘कौन’, ‘जंगल’ आणि इतर हिट चित्रपट रामूने दिले. मात्र, गेल्या काही वर्षांत सातत्याने सुमार चित्रपट दिल्याने प्रेक्षकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. एकूणच रामूला आता बॉलीवूडमध्ये स्थिरावण्यासाठी हिटची गरज आहे.

आजवरचे महागडे चित्रपट
बाहुबली: २०० कोटी
प्रेम रतन धन पायो : १८० कोटी
धूम-३ : १७५ कोटी
बँग बँग:१६० कोटी
हॅपी न्यू इयर:१५० कोटी
बातम्या आणखी आहेत...