मुंबई - अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाल्यानंतर वाडिया उद्योग समूहाचे प्रमुख नुस्ली वाडिया यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. नुस्ली वाडिया यांच्या दोन कर्मचा-यांना अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या नावाने फोनवरून धमकी देण्यात आली होती.
अभिनेत्री प्रीती झिंटा हिने नेस वाडियाविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केल्याच्या दुस-या आठवड्यात नुस्ली वाडिया यांना धमकी मिळाली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. पोलिसांनी धमकीप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले आहे. पोलिसांनी या संदर्भात वाडिया यांच्या दोन्ही सचिवांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धमकी देणा-याने आपण ऑस्ट्रेलियातून बोलत असल्याचा दावा केला होता, तर पोलिसांच्या चौकशीत धमकीचा फोन हा व्हीओआयपीवरून करण्यात आला होता, तर एसएमएस इराण मार्गे आल्याचे स्पष्ट झाले आहे.