आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओखी चक्रीवादळ: आज रात्री मुंबईला तडाखा?, वादळी वा-यासह पाऊस कोसळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दक्षिण भारतातील किनारपट्टीला तडाखा दिल्यानंतर तुफानी चक्रीवादळ ओखी मुंबईत धडकले आहे. हे चक्रीवादळ मुंबईत धडकले असले तरी त्याचा जोर कमीच आहे. असे असूनही मुंबई व आसपासच्या समुद्रकिनारी भागात वेगाच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

 

सह्र्यादीच्या पर्वतरांगेतही पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या इशा-यानंतर राज्य सरकारने आज रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगडसह पालघर व मुंबई येथील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या सुरु असलेल्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. 

 

ओखी वादळाचा परिणाम बुधवारपर्यंत राहणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मच्छिमार आणि नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी सायंकाळी मुंबई, कोकण किनारपट्टीसह कोल्हापूर, कराड व पुणे पट्ट्यात वेगाचे वारे वाहत होते.

 

ऊंचच ऊंच लाटा उसळणार.....

 

- मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने चक्रवादळाचा धोका पाहता नागरिकांना काळजी घेण्यास सांगितले आहे.

- सोबतच चार ते सात डिसेंबरपर्यंत समुद्रात ऊंचच-ऊंच लाटा उसळणार आहेत. आज दुपारी 12.43 वाजता 4.35 मीटर ऊंचीच्या लाटा उसळणार.

- मुंबईशिवाय सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री विनोद तावडेने ट्विट करून या जिल्ह्यात शाळा- कॉलेजला मंगळवारी आपत्कालीन सुट्टी जाहीर केली आहे.


ओखी वादळ अपडेट्स-

 

- आज दुपारी 12.43 वाजता 4.35 मीटर ऊंचीच्या लाटा उसळणार
- ईस्टर्न एक्स्प्रेस आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक कोडी
- दक्षिण मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात
- आज दिवसभरात ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे चैत्यभूमीवर भीमबांधव दाखल होऊ लागले आहेत.
- सुरक्षेच्या कारणास्तव दादर चौपाटीकडे जाणारे सर्व रस्ते बद
- पाऊस पडत असल्याने मुंबई लोकल ट्रेनवर वाहतूकीचा परिणाम, मध्य रेल्वे मार्गावरील जाणा-या गाडी उशिराने धावताहेत
- मुंबईत ओखी वादळ धडकले असून, त्याचा प्रवास आता दक्षिण गुजरातकडे सुरू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...