आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीशी अश्लील चॅटिंग करणे पडले महागात, युवकावर गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मैत्रीचा गैरफायदा घेत आपल्याच मैत्रिणीला फेसबुक मेसेंजरवरून अश्लील संदेश पाठवणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीनुसार किरण संदिप कोयंडे (वय- 21, रा. दांडी आवार, मालवण) या युवकावर मालवण पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मैत्रिणीने रविवारी रात्री उशिरा पोलिसात किरण याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
 
मालवण दांडी आवार येथील किरण कोयंडे याची मालवण शहरातील एका युवतीशी मैत्री होती. या मैत्रीतून त्याने त्या युवतीशी फेसबुक मेसेंजर चॅटिंग द्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली. ओळख व गाठीभेटी वाढत गेल्यावर या मैत्रीचा गैरफायदा घेत किरण याने काही महिन्यापुर्वी त्या युवतीच्या मोबाईलमधून फेसबुकचा पासवर्ड घेऊन तिच्या अकाऊंटवरून इतर मित्र-मैत्रिणींना अश्लील मॅसेज करण्यास सुरुवात केली.
 
आपल्या अकाउंट वरून आक्षेपार्ह मॅसेज येत असल्याची माहिती त्या युवतीला मित्रांद्वारे समजल्यानंतर किरण याचे प्रताप तिच्या लक्षात आले. तिने तात्काळ आपल्या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड बदलला. त्यामुळे तो राग मनात ठेवून किरण याने त्या युवतीला फेसबुकवर अश्लील मॅसेज पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा किरण याने त्या युवतीस अश्लील मॅसेज करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर किरण याच्या त्रासाला कंटाळून पोलिस ठाणे गाठले.
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...