आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: तरुणींची छेड, लुटमार हा आरोपींचा नित्याचाच धंदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करणारे आरोपी पाचही गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुणी आणि महिलांची छेड काढणे हा त्यांचा नित्यक्रम असल्याचे धोबीघाट परिसरातील महालक्ष्मी चहा व कोल्ड्रिंक्सचे मालक अशोक पातेहार यांनी सांगितले. या हॉटेलवर हे पाचही आरोपी नेहमीच बसलेले असायचे.


हे हॉटेल महालक्ष्मी रेल्वेस्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. चोर्‍या- हाणामार्‍या केल्यानंतर हे पाचही जण हॉटेलवर बसून आपल्या कारनाम्यांची जाहीर चर्चा करायचे. महिलांना छेडणे हा त्यांचा दिनक्रमच होता.
बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर अब्दुल चांद सत्तार शेख, विजय जाधव, सिराज खान, कासिम बंगाली व सलीम अन्सारी या पाचही जणांचे रेखाचित्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. त्यांचे चेहरे दिसल्यानंतर आपल्याला अजिबात आश्चर्य वाटले नाही. या भागातील रहिवाशांना त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती आहे. हे नराधम कायम नशेत असायचे. तसेच गल्लीमध्ये जोरात ओरडून धमकावणे हा त्यांचा नेहमीच धंदा होता. त्यांच्यावर चोर्‍या आणि दरोड्यांच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. एखाद्याला धमकी देऊन त्यांची कशी लूट केली याचीही ते सविस्तर चर्चा करायचे, असेही पातेहार यांनी सांगितले. या भागातील महिला, सर्वसामान्य नागरिक त्यांच्या दादागिरीला कंटाळले होते, मात्र दहशतीमुळे कोणीही त्यांच्याविरोधात जाण्याचे धाडस करत नसल्याचे ते म्हणाले.


बलात्कारानंतर पाहिला ‘दिलवाले दुल्हनिया’ चित्रपट
आरोपी विजय जाधव अत्याचार करून रात्री सात वाजता शक्तिमिल कंपाउंडमधून बाहेर पडला. त्याने एन. एम. जोशी मार्गावरील एका टपरीवर चहा घेतला. लोअर परळ भागातील बीडीडी चाळीजवळ त्याला काही मित्र दहीहंडीचा सराव करताना दिसले. तेथे जाधव दोन तास थांबला. त्यानंतर परत धोबीघाट येथे एका हॉटेलवर चहा घेऊन घरी निघाला. त्या वेळी दुसरा आरोपी सलीम अन्सारी त्याला भेटला. मग दोघांनी जवळच असलेल्या मच्छी बाजारात रात्र काढली. शुक्रवारी सकाळी फ्रेश झाल्यानंतर त्यांनी मराठा मंदिर येथे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांना चांद बाबू सत्तारला अटक झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जाधव हा व्हिडिओ पॉर्लरमध्ये लपला.


मोबाइल चोरी, पाकिटमारी
आमचे हॉटल सकाळी 4:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत उघडे असते. मात्र, हॉटेल उघडण्यापूर्वी हे पाचही जण सकाळी चार वाजेपासून हॉटेलबाहेर येऊन थांबायचे. गल्लीतील अनेक लोकांचे त्यांनी मोबाइल चोरून त्रास दिला आहे. त्यांना अटक झाल्याने आमची काही काळासाठी सुटका झाली. मोबाइल, दागिने आणि पाकिटमारीतील पैसे ते आपसात वाटून घ्यायचे. लुटलेले पैसे चहा, नाश्ता आणि दारूत उडवायचे.’’ अशोक पातेहार, हॉटेलचालक