आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Offender Of Women Do Not Give Candidate :dharmadikari Committee

स्त्रियांवरील अत्याचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना उमेदवारी नको :धर्माधिकारी सामिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सामाजिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी आधी स्वत:वर बंधने घालावीत. स्त्रियांवरील अत्याचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना त्यांनी उमेदवारी देऊ नये, असे मत माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने व्यक्त केले आहे. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कठोर शिक्षेची शिफारसही समितीने केली आहे.

प्रचलित कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून त्यात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य सरकारने न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने आपला अंतरिम अहवाल नुकताच गृह विभागाला सादर केला.

चंगळवादामुळे बदल : लग्न व मतदानासाठी 18 वर्षांची वयोमर्यादा कायद्याने ठरवली आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात मात्र ‘अल्पवया’च्या व्याख्येत बदल केला पाहिजे, अशी शिफारस समितीने केली आहे. चंगळवादी मानसिकतेने समाजव्यवस्था झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे कठोर कायदा राबवण्याच्या दृष्टीने 15 वर्षांवरील बलात्का-यांना अजिबात माफी नको. त्यांना शिक्षा करण्याची तरतूद करावी, अशी शिफारस समितीने केली आहे.
चालक परवाना रद्द करा : महिलांची छेडछाड करणा-या व्यक्तीचा चालक परवाना रद्द करावा, त्याला पासपोर्ट देऊ नये, अशी समितीची शिफारस आहे. चालक परवाना व पारपत्र या गोष्टी महत्त्वाच्या असल्यामुळे छेडछाड करण्यास कोणी धजावणार नाही, असे मत न्या. धर्माधिकारी यांनी या अहवालात व्यक्त केले आहे.