आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह वक्तव्य; जयंत पाटलांचे भाषण थांबवले, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी यांच्यात केली तुलना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शतकोत्तरीनिमित्त विधानसभेत मांडलेल्या ठरावावर राष्ट्रवादी पक्षातर्फे भाषण करताना जयंत पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांना मध्येच भाषण गुंडाळावे लागले. त्यानंतर त्यांच्याऐवजी गटनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त करत त्यांचे भाषण पूर्ण केले.  जयंत पाटील यांच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने हा प्रकार घडला.
  
जयंत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या बोचऱ्या आणि उपरोधिक शैलीत भाषण करताना इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करताना काही वाक्ये म्हटली. त्याबरोबर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उभे राहून आक्षेप घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वाक्ये ऐकून घेतली जाणार नाहीत, असे सांगितले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे नेते असून देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याबाबत अशी वाक्ये सहन केली जाणार नाहीत. आपण उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर बोलत असताना असे घाणेरडे राजकारण केले जात आहे. अजितदादा, तुम्ही गटनेते आहात, तुम्ही तरी इकडे लक्ष द्या, असे सांगून अध्यक्षांनी जयंत पाटील यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकावे, असे सांगत पाटील यांचे भाषण ऐकण्याची आम्हाला इच्छा नाही आणि आम्ही बहिष्कार टाकतो असे म्हटले. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी वक्तव्ये तपासून कामकाजातून काढून टाकली जातील, असे सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी उभे राहून दिलगिरी व्यक्त केली.  

पाटलांकडूनही दिलगिरी  
जयंत पाटील यांनी उभे राहून बोलण्यास सुरुवात केली तेव्हा सत्ताधाऱ्यांनी गोंधळ सुरू केला. जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत माझे भाषण अजून पुढे आहे, असे म्हणताच अजित पवार यांनी त्यांच्याकडे चमकून पाहिले. सत्ताधाऱ्यांनी गोंधळ सुरू केल्याने अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी गांधींवर बोलण्यास सुरुवात केली.

विखेंची शेराेशायरी...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी इंदिरा गांधी या देशातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व शक्तिशाली पंतप्रधान असल्याचे सांगत शेर सादर केला.
‘गुंगी गुडिया’ से ‘दुर्गा’ तक का सफर ना ही इतना आसान होता है...
कभी ‘शक्तिस्थल’ आकर देखो,
देश के लिये खुद को तबाह करना
कितना हसीन होता है....
बातम्या आणखी आहेत...