आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officers Going To Uttarakhand For Stranded State Citizen In Flood

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्‍ट्रातील प्रवाशांची सुटकेसाठी अधिकारी रवाना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्‍ट्रातील प्रवाशांची सुटका करून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी महाराष्‍ट्र शासनाने व्यापक उपाययोजना केली आहे. आतापर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, महसूल व परिवहन विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स व इतर कमर्चारी असे 50 जण उत्तराखंडमध्ये विविध ठिकाणी दाखल झाले आहेत. राज्यातील 2,130 व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश आले आहे. या कामात समन्वय ठेवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव आणि राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे संचालक विकास खारगे यांची डेहराडून येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वत: सातत्याने या अधिका-यांच्या संपर्कात राहून आढावा घेत आहेत.


राज्याची पथके उत्तराखंड आणि नवी दिल्ली येथे पाठवण्यात आली आहेत. या पथकांनी आपली कामे सुरू केली असून, अडचणीतून बाहेर आलेल्या सर्व प्रवाशांना महाराष्‍ट्रात सुखरूप पाठवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. राज्य शासनाने 24 तास कार्यरत असणा-या 022-22027990 / 22816625 या हेल्पलाइन सुरू केल्या आहेत.


डॉक्टरांचे पथक
पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या प्रत्येक विभागातून पाच कुशल डॉक्टरांचे पथक, तसेच एक उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार, एक नायब तहसीलदार, दोन लिपिक असे पाच व्यक्तींचे पथकही डेहराडून येथे विमानाने पाठवण्यात आले आहे. दरम्यान, औरंगाबाद येथून पाच डॉक्टर व अधिकारी विमानाने रवाना होतील, असे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.


अधिका-यांची नावे
इ एम.एस.रामचंद्रानी : सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य रस्ते विकास महामंडळ,
- 09987114993
इ मनोज रानडे : उपजिल्हाधिकारी, ठाणे - 09920782571
इ जयकृष्ण फड : उपजिल्हाधिकारी, रायगड - 08975178122
इ नितीन मुंडेवार : उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर - 09423962243
इ अमित शेडगे : नायब तहसीलदार, रायगड- 09766040931


अधिका-यांची नावे
इ एम.एस.रामचंद्रानी : सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य रस्ते विकास महामंडळ,
- 09987114993
इ मनोज रानडे : उपजिल्हाधिकारी, ठाणे - 09920782571
इ जयकृष्ण फड : उपजिल्हाधिकारी, रायगड - 08975178122
इ नितीन मुंडेवार : उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर - 09423962243
इ अमित शेडगे : नायब तहसीलदार, रायगड- 09766040931