आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ohter Country 's Hand In Solider Killing Prakesh Ambedkar

जवानांच्या हत्येत इतर राष्ट्रांचा हात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांची हत्या करण्यामध्ये तिस-या शक्तीचा हात असून त्यामागे अफगाणिस्तानमधील नाटोच्या फौजांच्या स्थलांतराचा मुख्य मुद्दा असल्याचा दावा भारिप-बहुजन पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात अ‍ॅड. आंबेडकर बुधवारी पत्रकारांशी बोलत होते.

अफगाणिस्तानामधील नाटोच्या फौजांमध्ये सर्वाधिक सैनिक अमेरिकेचे आहेत. त्या फौजा आता रिकाम्या झाल्या आहेत. या फौजांना काश्मीर किंवा चीनच्या मुस्लिम बहुल भागात (हून) अमेरिका उतरवण्यास उतावीळ झाली आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध बिघडवण्यासाठी 8 जानेवारी रोजी भारतीय सैनिकांची क्रूर हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता अ‍ॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केली. 8 जानेवारी रोजी दोन भारतीय जवानांच्या क्रूर हत्येप्रकरणी पाकिस्तानला तत्काळ प्रत्युत्तर द्यायला हवे होते, असे सांगून भारतीय लष्करप्रमुख पाकिस्तानला देत असलेले इशारे भारतीय लष्कराच्या वाढत्या हस्तक्षेपाची चुणूक आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर यांनी मत व्यक्त केले. तसेच यास पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारचा गलथानपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जातीचा कॉलम वगळा
देशातील सरकारी कागदपत्रांतील जातीचा कॉलम हद्दपार करण्यात यावा. धर्म आणि नागरिकत्व असे दोनच रकाने सरकारी कागदपत्रांवर हवेत, अशी मागणी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.