आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oil Ministry Mulling New LPG Connections On EMIs

आता ईएमआयवर नवीन गॅस कनेक्शन, २४ मासिक हप्त्यांत परतफेड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तेल वितरण कंपन्या नवीन एलपीजी गॅस कनेक्शन सुलभ मासिक हप्त्यांत (ईएमआय) देण्याबाबत विचार करत आहेत. पुढील तीन वर्षांत १० कोटी नवीन गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट कंपन्यांनी ठेवले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, ३,४०० रुपये मूल्य असलेले गॅस कनेक्शन २४ मासिक हप्त्यांवर देण्याचा विचार आहे. याबाबत तेल विपणन कंपन्या बँकांसोबत बोलणी करत आहेत. दारिद्र्यरेषेखालील लोकांना ५० टक्के सवलतीत गॅस कनेक्शन दिले जाते. दारिद्र्यरेषेवरील लोकांना या योजनेचा मोठा फायदा होईल.