आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओखी चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून भरपाई द्यावी; धनंजय मुंडेंची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ओखी चक्रीवादळामुळे झालेल्या परिणामाचे सर्वेक्षण, पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूप नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

कोकणातील शेती, फळबागांचे नुकसान

राज्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कोकणातील शेती व फळबागांचे नुकसान झाले आहे. पश्चिम, मध्य व उत्तर महाराष्ट्रात पिके, फळबागा, भाजीपाला यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. एका पत्राद्वारे मुंडेंनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. राज्याला ओखी चक्रीवादळाचा धोका असल्याबाबतचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. 4 व 5 डिसेंबर रोजी ओखी चक्रीवादळाने कोकण किनारपट्टी, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, मध्य व उत्तर महाराष्ट्रात मोठा प्रभाव निर्माण केला. किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागात पर्जन्यवृष्टी झाली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे सरकारने लगेचच सर्वेक्षण सुरू करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. वातावरण बदलामुळे रोगराई पसरण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...