आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखी समाजसेवा: जुन्या चपला-बुटांचा पुनर्वापर, शाळेत अनवाणी जाणाऱ्या 50 हजार मुलांना पादत्राणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बुट- चपला जुन्या झाल्यानंतर त्या टाकून देण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र, उदयपूरच्या श्रीयंस भंडारी व गढवालचे रमेश धामी यांनी चपलांना नवा लूक देऊन अनवाणी शाळेत जाणाऱ्या मुलांना आधार दिला आहे. श्रीयंस व रमेश सुरुवातीस जुने चप्पल-बूट एकत्र करून त्यावर पुनर्प्रक्रिया करतात. यात तयार झालेल्या चपलांचे शाळा, कॉलेज, झोपडपट्टी व गावातील मुलांना वाटप करतात. ३ वर्षांपासूनच्या उपक्रमात त्यांनी ४ राज्यांत ५० हजारांहून जास्त मुलांना चपला दिल्या आहेत. २०१८ पर्यंत हा आकडा दुप्पट केला जाईल. यासाठी त्यांनी ‘ग्रीन सोल’ कंपनीची स्थापना केली असून त्याचे मुख्यालय मुंबईला आहे. कंपनीचे स्वयंसेवक देशातील १५ राज्यांतील ५० मोठ्या शहरांतून जुन्या चपला- बूट जमा करत आहेत. ग्रीन सोलचे सहसंस्थापक श्रीयंस भंडारीने ‘दिव्य मराठी नेटवर्क’ला सांगितले की, २०१४ मध्ये जुन्या व वापरात नसलेल्या चपला, बुटाला नवा लूक देऊन ऑनलाइन विक्री करण्याची कंपनी सुरू केली होती. अनवाणी शाळेत जाणाऱ्या मुलांना त्या का देऊ नयेत, असा विचार आला. सर्वाधिक पादत्राणे बंगळुरू व दिल्लीत मिळाली. पुनर्प्रक्रियेसाठी आमच्याकडे १० कर्मचारी आहेत. पुनर्प्रक्रियेत बूट-चपलांचे सोल काढून, त्यांचे रिडिझाइन करून चपला बनवल्या जातात. सध्या अशा चपला गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व आसाममधील गरजू मुलांना दिल्या जात आहेत. दर महिन्यास सरासरी एक हजार चपला मुलांना घातल्या जातात. याशिवाय ऑनलाइन रिटेल बिझनेसही सुरू करत आहोत. ते उत्पन्नही गरजूंच्या चपलांसाठी वापरले जाईल. काही सेलिब्रिटींशीही बोलणे झाले आहे. त्यांच्या बुटांचा लिलाव करून मिळालेल्या पैशातून चपला बनवल्या जातील. 

भारतात ५% दरवर्षी ८ हजारांपेक्षा जास्त किमतीचे बूट घालतात
जगात जवळपास ३५ कोटी मुलांकडे पादत्राणे नाहीत. दरवर्षी सुमारे ३५ कोटी स्पोर्ट््स शूज फेकले जातात. चप्पल न घातल्यामुळे दरवर्षी २० लाख लोकांना संसर्गजन्य आजार होतो. सुमारे ५६% भारतीय, वर्षांत १ लाख रुपयांपेक्षा कमी रुपये पादत्राणावर खर्च करतात. २६% लोक १००० - ८००० रु. व ५% लोक ८००० पेक्षा जास्त रुपये पादत्राणांवर खर्च करतात.
बातम्या आणखी आहेत...