आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Old Tiger No Imporatant In Shiv Sena, Nawab Malik Remark On Manohar Joshi

म्हाता-या वाघांना शिवसेनेत किंमत नाही, नवाब मलिक यांची जोशींव‍िषयी प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची होत असलेली ससेहोलपट वेदनादायी आहे. शिवसेनेत म्हाता-या वाघांना काय स्थान असते हे सर्वांना पुन्हा कळाले, अशी प्रतिक्रिया राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.


काँग्रेस संपावी अशी गांधीजींची इच्छा होती, या मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना मलिक म्हणाले, मोदी आणि भाजपला गांधीजींच्या स्वप्नातील नव्हे तर त्यांच्या खुन्याच्या स्वप्नातील भारत घडवायचा आहे. त्यांचे गांधीप्रेम बेगडी असून गांधीचे नाव मोदींच्या मुखात शोभत नाही.भाजप आणि संघ परिवाराची भारतीय संविधान मोडीत काढायची योजना आहे. मात्र देशातील जनता त्यांची इच्छा कदापि फलद्रूप होऊ देणार नाही, असे मलिक म्हणाले.