आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INS विराट आज होणार नौदलातून सेवानिवृत्त, 30 वर्षांत केला 11 लाख किमीचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जगातील सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका INS विराट आज (6 मार्च) नौदलातून सेवानिवृत्त होणार आहे. तब्बल 30 वर्षे देशाला सेवा दिल्यानंतर ही युद्धनौका निरोप घेणार आहे. दरम्यान, यापूर्वी INS ‍विक्रांत नौदलातून निवृत्त झाले होते.

INS विराटने ब्रिटीश नौदलातही सेवा दिल्यानंतर भारतीय नौदलात दाखल झाली होती. 18 नोव्हेंबर 1959 मध्ये ‘एचएमएस हर्मिस’ ब्रिटिश नौदल म्हणजेच रॉयल नेव्हीत सामील झाली होती. 1982 मध्ये अर्जेंटिना आणि युकेमध्ये झालेल्या फाल्कलँड युद्धात ‘एचएमएस हर्मिस’ची प्रमुख भूमिका होती.

एप्रिल 1986 मध्ये ‘एचएमएस हर्मिस’ची भारताकडून खरेदी झाली. युकेच्या प्लायमाऊथ कंपनीकडून दुरुस्ती झाल्यानंतर 2 मे 1987 रोजी ‘एचएमएस हर्मिस’चे 'INS विराट' असे भारतीय नौदलाने नामकरण केले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 18 लढाऊ विमाने उभी करण्याची क्षमता

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...