आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OMC From Golden Hair To Pink Toilet Brush Sanstha Lists Chiefs Divine Changes

\'सनातन\'चे प्रमुख विष्‍णूचा अवतार, शरिरात झाला दैवी बदल; संस्‍थेचा वेबसाइटवर दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. जयंत आठवले - Divya Marathi
डॉ. जयंत आठवले
मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्‍या खून प्रकाराने चर्चेत आलेल्‍या 'सनातन' ने आपले प्रमुख जयंत बालाजी आठवाले हे भगवान विष्‍णूचा अवतार असल्‍याचा दावा आपल्‍या इंटरनेट ब्‍लॉगवर केला आहे. संस्‍थेने म्‍हटले की, डॉ. आठवले हे सामान्‍य पुरुष नाहीत. त्‍यांच्‍या शरिरात दैवी बदल होत आहे.
काय म्‍हटले ब्‍लॉगमध्‍ये?
* संस्था आणि अठवाले यांच्‍याशी निगडित वेबसाइट आणि अफिशियल ब्लॉग्समध्‍ये म्‍हटले की, आठवले हे भगवान विष्‍णू यांचा अवतार आहेत. त्‍यांचे केस सोनेरे होत असून, त्‍यांच्‍या शरिरातून दिव्य कण पडत आहेत. एवढेच नाही तर त्‍यांचे नख, कपाळ आणि जिभेवर ओम, कमळ आणि त्रिशूलाचे चिन्‍ह आले आहे. शिवाय त्‍यांचे शरीर सुगंधित झाले आहे. तसेच एका फोटोत एक पिंक टॉयलेट ब्रश दाखवला असून, त्‍याला दिलेल्‍या कॅप्‍शनमध्‍ये म्‍हटले की, आठवले याचा वापर करत असल्‍याने त्‍याचा रंग बदलला.
* spiritualresearchfoundation.org वर एका लेखात याचा उल्‍लेख केला आहे. यात म्‍हटले,'' या वर्षी डॉ. अठवाले यांच्‍या शरीरात निगेटिव्‍ह एनर्जी अॅटकमुळे अनेक बदल झाले आहेत.''
* इंडियन एक्‍स्‍प्रेस या इंग्रजी वृत्‍तपत्रानुसार, ऑर्गनाइजेशनद्वारा चालवणा-या या ब्लॉग englishsanatanprabhat. blogspot मध्‍ये अठवाले यांना भगवान विष्‍णू यांचे अवतार असल्‍याचे म्‍हटले आहे. ब्लॉगवरील लेखात म्‍हटले की, '' देशाला हिंदूराष्‍ट्र करण्‍यासाठी गुरू (डॉक्टर) अठवाले दिवस-रात्र उपवास करतात. त्‍यांच्‍या मनात कायम हाच विचार घोळत असतो. ते देवाचे अवतार आहेत. नदिपट्टी भविष्णवाणियरमध्‍ये ऋषींनीसुद्धा त्‍यांना विष्णूचा अवतार असेच म्‍हटले आहे. त्‍यांच्‍यावर शरिरावर आलेल्‍या अनेक चिन्‍हांतून ते स्‍पष्‍ट झाले आहे.
कोण आहेत अठवाले?
जयंत आठवले यांचा जन्‍म रायगड जिल्‍ह्यातील नागठाणे या गावात झाला. त्‍यांनी लंडन येथून क्‍लीनिकल हिपनोथ्रॅपीचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईत आले.

काय आहेत सनातनवर आरोप?
मुंबईमध्‍ये एका नाटकाचा प्रयोग थांबवण्‍यासाठी बॉम्‍ब ठेवल्‍याप्रकरणी 2007 मध्‍ये एटीएसने सनातनच्‍या तीन साधकांना अटक केली होती. पुढे 2009 मध्‍ये मडगाव बॉम्‍बस्‍फोटात 150 साधकांची चौकशी करण्‍यात आली होती. तसेच गोवा येथे बॉम्‍ब ठेवताना सतानतच्‍या दोन साधकांचा मृत्‍यू झाला होता. आता गोविंद पानसरे यांच्‍या हत्‍याप्रकरणात समीर गायकवाड या सनातनच्‍या साधकाला अटक करण्‍यात आली.
पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटोज...