आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • On 21st June Yoga Syllabus In School Education Minister Order

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२१ जूनच्या रविवारीही शाळा'योग', शिक्षणमंत्र्यांचा आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याने राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी रविवार असला तरी २१ जून रोजी शाळेत येऊन योगाचा अभ्यास करावा आणि शिक्षकांनी त्यांना योगाचे महत्त्व पटवून सांगावे, असा आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिला. याबदल्यात एक दिवस सुटी दिली जाईल, असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

यशवंतराव चव्हाण सभागृहात शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग दिन पूर्वतयारी कार्यशाळा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, योग समितीचे निमंत्रक उदय देशपांडे आदी उपस्थित होते. तावडे म्हणाले, २१ जून रोजी महाराष्ट्रातही योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, त्या दिवशी रविवार असला तरी शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात यावे. त्याची शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नंतर बदली सुटी देण्यात येईल. त्याचे लवकरच परिपत्रकही काढले जाईल.