आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26 मे रोजी मोदी सरकारची \'पुण्यतिथी\' साजरी करणार- अशोक चव्हाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील जनतेला भरमसाठ आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने पहिल्या वर्षातच भ्रमनिरास केला आहे. त्यामुळेच आम्ही येत्या 26 मे रोजी मोदी सरकारच्या 'अच्छे दिन' पुण्यतिथी राज्यभर साजरी करणार आहोत अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
येत्या 26 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. लोकांना खोटी आश्वासने देऊन मोदी यांनी सत्ता मिळवली आहे. अच्छे दिन आणणार असा नारा दिला मात्र तो सत्यात आणला गेला नाही. राज्यातून टोल हद्दपार करू, महागाई कमी करू, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करू, शेतक-यांच्या पिकांना योग्य भाव देऊ व त्यांना न्याय देऊ अशी एक ना अनेक आश्वासने मोदींनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दिली होती. मात्र, त्यातील एकही आश्वासन सत्यात उतरताना दिसत नाहीये. राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात हत्या करीत आहेत. तरीही हे सरकार काहीही निर्णय घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे मोदी सरकारचे हेच का ते 'अच्छे दिन' म्हणून आम्ही या सरकारची पुण्यतिथी साजरी करणार आहोत असे चव्हाण यांनी सांगितले. येत्या 26 मे रोजी राज्यभर काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करतील असेही चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातील फडणवीस सरकार तर मोदी सरकारपेक्षा फारच कुचकामी ठरले आहे असेही चव्हाण यांनी राज्यातील युतीवर सरकारवर टीका करताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...