आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO :ऑन ड्युटी बार गर्ल्ससोबत डान्स व किसिंग करणारे दोन पोलिस निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाण्यातील मनपाडा पोलिस स्टेशनमधील दोन पोलिस कर्मचारी ऑन-ड्यूटी बार गर्ल्ससोबत किस करताना व नाचताना आढळून आले आहेत. त्यांची ही करतूत कॅमे-यात कैद झाली आहे. ठाणे शहरातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांना संजय बब्बर आणि राशिद मुलानी या पोलिस कर्मचा-यांचा बार गर्लसोबत किस करतानाचा व्हिडिओ मिळाला आहे. त्यानंतर या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना मागील आठवड्यात इंद्रप्रस्थ बारमधील आहे जेथे हे दोन पोलिस शिपाई गेले होते.
छाप्यानंतर मिळाला व्हिडिओ- याबाबत सांगितले जात आहे की, मागील काही दिवसापासून डीसीपी संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष पथकाने मनपाडा रोडवरील अनेक बारमध्ये छापे टाकले. त्यानंतर हा व्हिडिओ बाहेर आला आहे. हे दोन्ही पोलिस कर्मचारी जाधव यांच्या नेतृत्त्वाखालील पथकात होते. या प्रकरणाची माहिती असलेल्यांनी सांगितले की, पोलिस बारवर छापा मारत होते तर त्याच पथकातील पोलिस कर्मचारी मात्र त्या बारमध्ये बार गर्लसोबत मज्जा मारत होते. त्यानंतरच बारमधील लोकांची हा व्हिडिओ पोलिस अधिका-यांपर्यंत पोहचवल्याचे समोर येत आहे. ऑन-ड्यूटी दोन्ही पोलिस कर्मचारी बार गर्लसोबत किस करतानाचा व्हिडिओ ज्वाइंट पोलिस कमिश्नर व्ही व्ही लक्ष्मी नरायण यांच्यापर्यंत पोहचला. त्यानंतर त्या दोघांचे बिंग फुटले. दरम्यान, पोलिसांच्या या करतूतीनंतर महाराष्ट्रात बारवर बंदी असतानाही मुली कशा काय नाचू शकतात असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
काय आहे क्लिपमध्ये-
पोलिसांच्या या क्लिपमध्ये हे दोघेही बॉलिवूडमधील गाण्यांवर बार गर्लसोबत नाचताना दिसत आहेत. या दरम्यान बार गर्ल्ससोबत नाचतानाच तिचा किस घेतानाही पोलिस दिसत आहे. क्लिपमध्ये मुलाणी हा एक बार गर्लला पकडून तिच्या अंगावरून हात फिरवताना दिसत आहे तर बब्बर बार गर्लसोबत डान्स आणि किंसिंग करताना दिसत आहे.
काय म्हणणे आहे पोलिसांचे - या घटनेनंतर ठाणे पोलिसांची लख्तरे निघाली आहेत. तसेच पोलिस आणि बारवाल्याचे कसे संबंध असतात ते पुढे आले आहे. या घटनेबाबत एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने नाव सार्वजनिक न करण्याच्या अटीवर सांगितले की, ऑन-ड्यूटी पोलिस कर्मचारी बार गर्ल्ससोबत ज्या इंद्रप्रस्थ बारमध्ये डान्स करताना दिसून येत आहेत त्याच बारवर पोलिसांनी छापेमारी केली होती. तरीही येथे बार गर्ल्स आणल्या जात होत्या. इंद्रपस्थ बार नेहमीच वादात राहिला आहे. पोलिसांना पैसे देऊन येथे डान्सबार चालवला जातो असे सांगण्यात येत आहे.
माध्यमांनी आवाज उठवल्यावर निलंबित केले- या पोलिस कर्मचा-यांची क्लिप समोर आल्यानंतरही ज्वाईंट सीपी यांनी त्यांच्यावर कोणतेही कारवाई न करता मनपाडा पोलिस ठाण्याच्या हेडक्वार्टर्समध्ये ड्यूटीवर पाठवले गेले. त्यांच्या चौकशीचे आदेश देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. मात्र, राज्यात डान्सबरवर बंदी असतानाही पोलिसच कसे काय बार गर्लसोबत थिरकतात असा सवाल माध्यमांनी उठवला. त्यानंतर या दोन्ही पोलिसांना निलंबित केले गेले आहे.
पुढे तो VIDEO पाहा, बार गर्ल्ससोबत पोलिस कसा करतो आहे डान्स व किंसिंग...
बातम्या आणखी आहेत...