आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Once Again Sexuall Offend In Mumbai, Rape On Lady

मुंबईत पुन्हा अत्याचाराची घटना; गुंगीचे औषध देऊन युवतीवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईत महिलांवरील अत्याचाराची मालिका अद्याप थांबलेली नाही. छायाचित्रकार युवतीपाठोपाठ आता एका 16 वर्षीय मुलीवर तिच्या प्रियकराने व एका 49 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना बुधवारी वांद्रा भागात उघडकीस आली.


पीडित मुलगी मैत्रिणीसोबत 17 ऑगस्ट रोजी रात्री शेजारी राहणा-या अख्तर कुरेशीच्या बेहरामनगरातील घरी गेली होती. कुरेशीने तिला गुंगीचे औषधयुक्त पेय पाजले. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. सकाळी उठल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. सकाळी कुरेशीच्या घरातून बाहेर पडत तिने प्रियकर विजयकुमार ऊर्फ मोहंमद अलीकडे 15 दिवस आश्रय घेतला. याआधीही ती स्वत:चे घर सोडून प्रियकराकडे राहिली होती. पीडित मुलीला कधी स्वत:च्या घरी तर कधी प्रियकराच्या घरी राहायची सवयच होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवारी घरी परतल्यानंतर तिला वांद्र्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब घेतला. कुरेशीने आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. तसेच प्रियकर अलीनेही अनेकदा लैंगिक शोषण केल्याचा जबाब पीडित मुलीने दिला. यानंतर पोलिसांनी कुरेशी आणि विजयकुमारविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.