आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँक ऑफ बडोदामधील दरोडा: मालेगावमधून संशयित अटकेत; अर्धा किलो सोने जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नवी मुंबईच्या जुईनगर भागातील बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरणी पोलिसांनी  मालेगावमधून (जि. नाशिक) एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. संजय वाघ असे त्याचे नाव असून तो सूवर्ण कारागिर आहे. त्याने बँकेतून चोरीला गेलेले सोने विकत घेतले होते. त्याच्याकडून अर्धा किलो सोने पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी मालेगावच्या छावणी पोलिस ठाण्यात अटकेची नोंद करण्यात आली आहे.

 

सानपाडा पोलिस आणि क्राईम ब्रान्चच्या पथकाने या जबरी दरोड्याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी 500 ग्रॅम (अर्धा किलो) सोन्याचे दागिने मालेगाव येथून एका सूवर्ण कारागिराकडून जप्त केले आहे.

 

दीपक मिश्रा मास्टरमाईंड...

नालासोपारा येथील 30 वर्षीय दीपक मिश्रा हा या दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्टेशनजवळील बॅंक ऑफ बडोदा शाखेवर 70 फुटावरील एका दुकानातून भुयार खोदून दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी जवळपास 30 हून अधिक लॉकर फोडून सुमारे 2 कोटी रुपयांची मालमत्ता त्यांनी लुटली होती.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... चोरट्यांनी किराणा दुकानातून लॉकर रूमपर्यंत  खोदले होते 50 फुटांचे भुयार... 

 

बातम्या आणखी आहेत...