आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Gurdian Minister For Five Drought Proven Taluka

पाच दुष्काळी तालुक्यांसाठी एक पालकमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील दुष्काळाची स्थिती अतिशय गंभीर होत असून मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष कमालीचे वाढले आहे. ही बाब लक्षात घेता आता जिल्हावार असलेल्या पालकमंत्र्यांऐवजी पाच दुष्काळी तालुक्यात एक पालकमंत्री नेमण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिका-या ने दिली. दरम्यान, दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही या माहितीस दुजोरा दिला. या पालकमंत्र्यांनी दर आठवड्याला संबंधित तालुक्यांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन कार्यवाही करावी, असे सरकारचे नियोजन आहे.