आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One More Judge Physically Assualted Junior Women In Mumbai

मुंबई: कनिष्ठ महिला कर्मचा-याचे लैंगिक शोषण केल्याने न्यायाधिश निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक छायाचित्र)
मुंबई- मुंबई सेशन कोर्टातील न्यायाधीश एम. पी. गायकवाड यांना सहकारी महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. न्यायाधीश गायकवाड सध्या मुंबईच्या नार्कोटीक कोर्टात काम पाहत आहेत. न्यायाधिश गायकवाड यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप कोर्टातच कनिष्ठ कर्मचारी असलेल्या महिलेने केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने न्यायाधिश गायकवाड यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे.
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसारच, गायकवाड यांचे निलबंन करण्यात आले आहे. आता त्यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे. कोर्टातच कनिष्ठ कर्मचारी काम करीत असलेल्या महिलेने आरोप केल्यानंतर त्याची खातरजमा करण्यात आली. यात न्यायाधिश गायकवाड यांनी संबंधित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे पुढे आले आहे. तसेच महिलेने केलेले आरोपात तथ्य असल्याने मुंबई हायकोर्टाने गायकवाड यांना थेट निलंबित केले आहे. आता गायकवाड यांच्या प्रकरणाची विभागीय चौकशी न्यायाधीश एस. डी. तुलानकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील प्रमुख न्यायालयातील न्यायाधिशांनी आपल्या सहकारी महिला न्यायाधिश, कनिष्ठ महिलांचे, इंटर्न युवतींचे लैंगिक शोषण केल्याच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. यात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिशही अपवाद नाहीत. गेल्या महिन्यात पुण्यातील एका न्यायाधीशांवरही 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. आता मुंबई सेशन कोर्टाच्या न्यायधीशांवर हा लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. एकूनच आपल्या अधिकाराचा वापर करून सहकारी महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, यापूर्वीही अशा घटना घडत होत्या. सर्वच क्षेत्रात पॉवरफूल्ल व मोठ्या पदावर असलेली लोक आपल्या आसपासच्या महिलांचे शोषण करीत असत. पूर्वी महिलांचा आवाज दाबला जायचा. मात्र, आजच्या युवती व महिला न घाबरता आपल्यावर होणा-या अन्यायाला वाचा फोडू लागल्या असल्याचे मत एका महिला न्यायाधिशाने व्यक्त केले.