आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळबादेवी आग: जखमी अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काळबादेवीत 9 मे रोजी लागलेल्या आगीत जखमी झालेले अग्निशमन दलप्रमुख सुनील नेसरीकर यांचे रविवारी ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे या दुर्घटनेतील बळींची संख्या चार झाली आहे. सर्व जण अग्निशमन अधिकारी आहेत.
सुनील नेसरीकर 50 टक्के भाजले होते. त्यांच्यावर त्वचारोपणाची एक शस्त्रक्रियाही झाली होती. त्यानंतर त्यांचे एकएक अवयव निकामी होत गेले. चार दिवस त्यांना उच्च तापही होता. जंतुसंसर्ग वाढल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छ‌्वासावर ठेवण्यात आले होते, असे डाॅ. सुनील केसवानी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...