आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 बँकांना 2600 कोटींचा गंडा घालणाऱ्यास अटक; मुंबई, इंदूरसह स्वित्झरलॅन्डमध्ये 485 कंपन्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झूम डेवलपर्सचा संचालक विजय एस. चौधरी याला मंगळवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. (फाईल) - Divya Marathi
झूम डेवलपर्सचा संचालक विजय एस. चौधरी याला मंगळवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. (फाईल)
मुंबई - ईडी (अंमलबजावणी संचालनालय)च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील एका कंपनीच्या संचालकाला अटक केली. अटकेत असलेल्या व्यक्तीने 25 बँकांना कर्जाच्या स्वरुपात 2600 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत ही कारवाई केली आहे.
 
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, झूम डेवलपर्सचा संचालक विजय एस. चौधरी याला मंगळवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अधिकारी त्याचा कित्येक दिवसांपासून शोध घेत होते. त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने 25 बँकांना 2650 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे आरोप आहेत. 
 
कर्ज घेतले पण, फेडले नाहीत
झूम डेवलपर्सने विविध 25 बँकांकडून 2650 कोटी रुपयांचे लोन घेतले होते. त्यापैकी कोणतेही कर्ज फेडण्यात आलेले नाही. सर्वात ताजे प्रकरण 966 कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित आहे. एकच उद्योग समूह असतानाही वेगवेगळ्या कंपन्या आणि इंडस्ट्रीज (इंडिविजुअल एंटायटीस) दाखवून हे कर्ज काढल्याची कबुली कथितरीत्या कंपनीने दिली आहे. 
 
सीबीआयच्या एफआयरवर झाला तपास
ईडीने सीबीआयच्या एफआयरवरून या प्रकरणाचा मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार तपास सुरू केला. सीबीआयने संबंधित कंपनीचा संचालक चौधरीच्या विरोधात 5 आरोप पत्र यापूर्वीच दाखल केले आहेत. चौधरी आपल्या कंपन्या इंदूर आणि मुंबईवरून चालवत असल्याने त्याला इंदूरच्याच कोर्टात हजर करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
 
चौधरीकडे तब्बल 485 कंपन्या
2650 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा चौधरी हाच सूत्रधार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आपल्या विविध सहकाऱ्यांच्या नावे त्याने 485 कंपन्या स्थापित केल्या आहेत. यासोबतच, चौधरीने स्वतःच्या दोन ट्रस्ट देखील स्थापन केल्याचे आरोप आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर चौधरीच्या स्वित्झरलॅन्डमध्ये 5 कंपन्या आहेत. या सर्वांचा नफा त्यालाच मिळतो.
बातम्या आणखी आहेत...