आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- सुरक्षित होळी खेळण्यासाठी सर्वत्र आवाहन करण्यात येत असतानाच मुंबईत काही विकृत प्रवाशांच्या होळीमुळे धावत्या लोकलमधुन 8 जण पडले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून 7 जणांवर भाभा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सोमवारी रात्री आठच्या सायन रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडला.
दादरवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी धीमी लोकल रात्री 8 वाजता सायन स्टेशनजवळ असताना विरुद्ध दिशेने येणा-या लोकलमधून काही विकृत प्रवाशांनी दाराजवळ उभे असलेल्या प्रवाशांवर अचानक गुलाल फेकला. त्यामुळे आठ प्रवाशांचा तोल गेला आणि ते खाली पडले. या अपघातात जी. नित्यानंद (26) याचा मृत्यू झाला. इतर सात प्रवाशांमध्ये एका महिलेचा समावेश असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली.
दिपक (30), श्रीनिवास (30) यांची प्रकृती गंभीर आहे. तर अखिलेश गुप्ता (24), मन्नू परमार (20), सुशांत भोईर (22) आणि लक्ष्मण त्र्यंबके (20)अशी जखमींची नावे आहेत. मन्नू परमान ही महिला प्रवासी महिला डब्यातून प्रवास करीत होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.