आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो भाळला तिच्या सौदर्यावर, तिला केले प्रपोज, तिने नकार दिल्यावर तिची केली अशी अवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी इम्रान हा मरियम सोबत काम करत होता. - Divya Marathi
आरोपी इम्रान हा मरियम सोबत काम करत होता.
मुंबई- तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. एक दिवस कोणीही नसल्याचे पाहून त्याने तिला प्रपोजही केले पण तिने त्याला नकार दिला. हा नकार तो पचवू शकला नाही. त्यानंतर त्याने तिचा खून करुन तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन फेकुन दिला.
 
दीड वर्षापासून लागला होता मरियमच्या मागे
- मरियम शेख ही युवती सी वूड येथील एका स्पा मध्ये काम करत होती.
 आरोपी इम्रान हा मरियमसोबत काम करत होता. तो उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील आहे. इम्रान हा दीड वर्षापासून मरियमच्या मागे लागला होता.
- इम्रान हा काम करुन याच स्पामध्ये झोपत होता. रविवारी त्याने स्पा बंद करण्याच्या वेळी मरियमला ग्राहक येणार असल्याचे सांगत थांबवून ठेवले.
- दुकानातील अन्य कर्मचारी निघुन गेल्यावर त्याने मरियमला प्रपोज केले. मरियमने त्याला नकार कळविल्यावर त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर इम्रानने गळा दाबून तिचा खून केला.
- खून करण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्ही बंद करुन ठेवला होता.
 
घरात एकटीच कमावणारी होती मरियम
- मरियम शेख ही घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती. ती गोवंडीतील शिवाजीनगर लगत असणाऱ्या रफीक नगरमध्ये राहत होती. तिच्या मागे वृध्द आई-वडिल आणि बहिण-भाऊ आहेत.
- मरियमचा मृत्यू झाल्याने तिच्या घरच्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे.
 
मरियमचे डोके करण्यात आले होते धडापासून वेगळे
- मरियमचा खून केल्यावर इम्रानने एका चाकुने तिचे शिर धडापासून वेगळे केले. तिचे धड त्याने एका सुटकेसमध्ये कोंबले.
- इम्रान ही सुटकेस घेऊन दुकानातुन बाहेर पडला. त्यानंतर त्याने ही सुटकेस करावे या गावात नेऊन निर्जन ठिकाणी फेकली.
- मरियमचे धड सुटकेसमध्ये बसत नसल्याने त्याने तिचे हात-पायही कापले. करावे गावातील एका व्यक्तीने ही वेवारस सुटकेस पाहिल्यावर पोलिसांनी ही बाब कळवली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचल्यावर ही मरियमचे शव पोस्टमार्टमसाठी पाठवले.
 
अशी पटली मृतदेहाची ओळख
- पोलिसांनी मरियमचा फोटो मुंबई आणि ठाण्यातील सर्व पोलिस ठाण्यांना पाठवला. काही तासातच पोलिसांना हा मृतदेह मरियमचा असल्याचे कळाले.
- रविवारी रात्रीच मरियम हरविल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.
- मरियमच्या घरच्यांनी ती रोज रात्री 10 वाजता घरी येत असल्याचे सांगितले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने पोलिसांकडे तिच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली होती. रात्री 11 वाजता तिचा फोन लागत होता पण त्यानंतर तिचा फोनही लागत नव्हता.
 
असा पकडला गेला खून करणारा इम्रान
- पोलिसांनी मृतदेह फेकण्यात आलेल्या ठिकाणच्या आजुबाजूच्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना सुटकेस नेत असताना इम्रान दिसला.
- पोलिस इम्रानपर्यंत पोहचले तेव्हा तो खून करुन उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत होता.
 
पुढील स्लाईडवर पाहा मरियमचे फोटो
 
 
बातम्या आणखी आहेत...