आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य सरकारची एक गाव, एक िवद्युत सेवक योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ग्रामीण भागात एक िवद्युतसेवक (लाइनमन) अनेक गावांमध्ये कार्यरत असतो. मात्र, वेळेअभावी तो सर्व गावांत जाऊ शकत नाही. परिणामी अनेक गावांत छोट्या- छोट्या कारणांमुळे विजेविना अंधारात राहावे लागते. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने एक गाव, एक लाइनमन ही योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतकडून या लाइनमनची नियुक्ती करण्यात येणार असून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना यासाठी प्राधान्य देण्यात येणार असून कंत्राटी पद्धतीने मासिक ६ हजार वेतन त्यांना देण्यात येईल. याचबरोबर महावितरणतर्फे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रंानी िदली.
गावात लाइनमन हा खूप महत्वाचा असतो. वीजेच्या अडचणीसंदर्भात गावातील छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ग्रामस्थ त्याच्यावर अवलंबून असल्याने तो लवकर उपलब्ध व्हावा, अशी साधी मागणी असते. पण ती पूर्ण होत असल्याचे नेहमीच िदसून आले आहे. सध्या राज्यात २७, ९२३ ग्रामपंचायती असून त्यांना ही वीज सेवा झटपट िमळावी, असा िनर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे.

जबाबदारी ग्रामपंचायतीवर : हा लाइनमन फ्रेंचाईझी म्हणून मीटर रिडिंग घेणे, वीज देयकांचे वाटप करणे, ब्रेकडाऊन अटेंड करणे, वीजपुरवठा पूर्ववत करणे, िडआे फ्युज टाकणे, फ्युज काॅल तक्रारींचे िनवारण करणे, रस्त्यावरील पथ िदव्यांची देखभाल, दूरस्ती किंवा बदली करणे, नवीन जोडणीची कामे करणे, थकबाकीपोटी वीजपुरवठा खंंडित करणे ही कामे करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...