आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांद्याचे भाव उतरण्यास 15 दिवस लागणार : कृषिमंत्री विखे पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात कांद्याची साठेबाजी करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. येत्या 15 दिवसात कांद्याची आवक वाढल्यानंतर भाव खाली येतील, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, केंद्र सरकारने निर्यातीवर अंकुश ठेवण्यासाठी कांद्याचे किमान निर्यातमूल्य 650 डॉलर प्रतिटन निश्चित केले.

कांद्याची आवक कमी झाल्याने भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. यावर मात करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. आवक वाढण्याची शक्यता असल्याने कांदा आयातीबाबत अद्याप विचार केलेला नाही. साठेबाजांना आवरण्यसाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचनाही देण्यात आल्याचेही ते म्हणाले.