मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे.
दहावीसाठी पहिल्यांदाच या आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा कार्यक्रम शिक्षण मंडळाने नुकताच जाहीर केला आहे. १० ते २० नोव्हेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज घेतले जाणार अाहेत. त्यानंतर २१ ते २८ नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्क द्यावे लागणार आहे.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना
आपल्या शाळेच्या माध्यमातून अर्ज भरता येतील. राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी आॅनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील वर्षांपासून सुरू केली आहे. यंदा दहावीसाठी ही प्रक्रिया पहिल्यांदाच राबवण्यात येणार आहे.
ग्रामीण भागाला सवलत
इंटरनेट आणि इतर काही अडचणी उद्भवल्यास ग्रामीण भागातील शाळांना काही सूट देण्याचा विचारही शिक्षण मंडळ करत आहे.इतर सरकारी योजनांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी मंडळाकडून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.