आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचालकाच्या खात्यावरून एक कोटीची ऑनलाइन चोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आरटीजीएस प्रणालीचा वापर करून एका बड्या कंपनीत संचालक पदावर काम करणा-या व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल 1 कोटी रुपये भामट्याने ऑनलाइन लंपास केल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 54 लाख रुपये जप्त केले आहेत.

अंकुश कोरणे हे एका कंपनीत संचालक पदावर कार्यरत असून त्यांचे मुलुंड येथील येस बँकेत खाते आहे. कोरणे यांना दोन दिवसांपूर्वी सकाळी 12 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज मोबाइलवर आला. यानंतर पुन्हा 5 लाख रुपये डेबिट तर पुन्हा तिस-यांदा 15 लाख डेबिट झाल्याचा मॅसेज आला. मात्र, आपण कोणताही व्यवहार केला नसल्याने त्यांनी बँकेत खाते गोठवण्याच्या सूचना केल्या. मात्र, बँक प्रशासनाने त्यास नकार दिला. तोपर्यंत 45 मिनिटांत त्यांच्या खात्यातून तब्बल एक कोटी रुपये लांबवण्यात आले. घटनेनंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला काही तासांतच अटक केली आहे. मात्र, आरोपीने एवढ्या मोठ्या प्रमाणात सायबर चोरी कशी केली याबाबतची माहिती न मिळाल्याने तपास अधिकारी व पोलिस यंत्रणा चक्रावून गेली आहे.

बँकेचा नाकर्तेपणा - पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज मोबाइलवर येताच कोरणे यांनी बँकेत संपर्क सांधून खाते गोठवण्यास सांगितले. मात्र, बँकेने आधी पोलिस तक्रारीची प्रत आम्हाला द्या, असा हट्ट धरला. त्यामुळे चोरट्यांचे पुढील व्यवहार मला थांबवता आले नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.