आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनलाइन प्रमाणपत्रे ग्रामपंचायतींना सक्तीची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी लागणारी विविध प्रमाणपत्रे आता ऑनलाइन देणे ग्रामपंचायतींसाठी सक्तीचे केले आहे. त्यासाठी ग्रामस्थांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घेण्याची गरज उरलेली नाही. इंटरनेटचा फायदा तळागाळापर्यंत पोहोचावा व प्रशासनाचे व्यवहार सोपे व्हावेत म्हणून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पाऊल उचलले असून आता बहुतेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

राज्यातील 27 हजार 980 ग्रामपंचायतींमध्ये संगणकाची सुविधा आहे तर 26 हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत. उरलेल्या ग्रामपंचायती दुर्गम असल्यामुळे त्यांना इंटरनेट सेवा मिळालेली नाही. सध्या या 26 हजार ग्रामपंच्ेायतींमधून विविध प्रमाणपत्र लोकांना उपलब्ध करून देण्याचे काम सुरू झाल्याची माहिती ग्रामविकास विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. या प्रमाणपत्रांमध्ये जन्म-मृत्यू, दारिद्रय़रेषेखालील दाखला, रहिवासाचा-हयातीचा दाखला, मालमत्ता आकारणी, वीज जोडणी आदी 13 प्रमाणपत्रांचा समावेश असल्याचे विभागातील वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

ग्रामसुविधा केंद्र
ग्रामपंचायतींचे ग्रामसुविधा केंद्रात रूपांतर करण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी प्रयत्न चालवले आहेत. एखाद्या लहानशा कामासाठी पैसे आणि वेळ खर्च करून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे लोकांसाठी कठीण असते. अशावेळी शक्य त्या सुविधा गावातच देण्याचा प्रयत्न ग्रामविकास विभागाच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे.