आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करुग्णांस टाटाचा मोफत ऑनलाइन सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कर्करोगाने ग्रस्त रुग्ण आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाइन सल्ला घेऊ शकतील. आशियातील सर्वात मोठे कर्करोग रुग्णालय टाटा मेमोरियल सेंटरने (टीएमसी) नव्या नेटवर्कसोबतच्या सहकार्याने गरीब कर्करुग्णांसाठी ही मोफत सुविधा सुरू केली आहे. परदेशी रुग्णांना मात्र शुल्क आकारले जाईल.

टीएमसीचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी मंगळवारी सांगितले की, देश-विदेशातील सर्व प्रकारच्या कर्करोगाने पीडित गरीब रुग्ण "टीएमसी ऑनलाइन' सुविधेचा फायदा घेऊ शकतील.
टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या कर्करोगतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी www.tmc.gov.in वेबसाइटवर लाॅगइन करावे लागेल. मे २०१४ मध्ये स्तनाच्या कर्करुग्णांसाठी ऑनलाइन सल्ल्याची सुविधा सुरू करण्यात आली होती. जगभरातील दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी नावनोंदणी केली होती. सुमारे ६६० वर रुग्णांनी त्याचा फायदा घेतल्याचे
बडवे म्हणाले.
टाटा रुग्णालयाचे प्रवक्ते सैय्यद जाफरी म्हणाले, या सेवेसाठी रुग्णालय व डॉक्टर कोणतेही शुल्क आकारणाार नाहीत.

असा घेता येईल सल्ला
ऑनलाइन सल्ल्याच्या सुविधेसाठी रुग्ण वा त्याच्या कुटुंबीयांना मेडिकल रिपोर्ट टीएमसीच्या वेबसाइटवर अपलोड करावे लागतील. यानंतर नव्या नेटवर्क व टीएमसीचे तज्ज्ञ रिपोर्टवर चर्चा करून उपचारांसाठी संबंधित रुग्णाला तज्ज्ञांचा सल्ला देतील. यामुळे त्यांच्या पैशांसह वेळेचीही बचत होईल.

ऑनलाइन सुविधा स्वस्त
या सेवेसाठी मदत करणाऱ्या नाव्या नेटवर्कच्या संस्थापक गीतिका श्रीवास्तव म्हणाल्या, गरीब रुग्णांना ही सेवा मोफत आहे. फुप्फुसे, मुख, स्त्रीरोग, कोलोन, रक्त व सर्व कर्करुग्णांसाठी मोफत सल्ला मिळेल. रुग्णालयात डॉक्टरांचा सल्ला घेण्यात जास्त पैसे व रक्कम खर्च होते. त्या तुलनेत ही प्रक्रिया सोपी व सहज आहे.

अाठ लाखांमागे एकच तज्ज्ञ डाॅक्टर
भारतात दर ८ लाख लोकसंख्येमागे केवळ एकच ऑन्कालॉजिस्ट (कर्करोगतज्ज्ञ) आहे. रुग्णांची संख्या मात्र १८ लाखांच्याही वर आहे. यामुळे हजारो लोकांना वेळेवर योग्य सल्ला व उपचार मिळू शकत नाही. यामुळे या सुविधेचा निर्णय घेण्यात आला.