आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस विक्रीसाठीही बाजार समित्यांत ऑनलाइन नोंदणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समित्यांत १८ ऑक्टोबरपासून सुरू होईल. नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी होईल. हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करू नये, असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

राज्यात पणन महासंघाची ६० खरेदी केंद्रे आणि सीसीआयची १२० खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा कापूस आणावा. तो माफक आर्द्रतायुक्त असावा, याची काळजी घ्यावी. कापसाची हमी भावाने खरेदी केली जाईल. केंद्राच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने कापसाच्या विविध जातींचे दर जाहीर केले आहेत. 
 
कापसानुसार दर असे 
ब्रह्मा जातीच्या कापसासाठी ४,३२० रुपये प्रतिक्विंटल, एच - ६ जातीच्या कापसासाठी ४,२२० रुपये प्रतिक्विंटल, एलआरए जातीच्या कापसासाठी ४,१२० प्रतिक्विंटल असे हमी भाव जाहीर केले आहेत.   
बातम्या आणखी आहेत...