मुंबई - बँकांचे थकीत कर्ज (एनपीए) वसूल करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने जोरदार हालचाली सुरू केल्या असून बँकेच्या अंतर्गत सल्लागार समितीने (आयएसी) सर्वाधिक अनुत्पादित मालमत्तेच्या ५०० खात्यांची यादी तयार केली आहे. यातील एकट्या १२ खातेदारांकडे प्रत्येकी ५ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकीत आहे.
ही रक्कम बँकांच्या एकूण थकीत कर्जाच्या २५ टक्के आहे. या खातेदारांवर कारवाईची शिफारस समितीने केली आहे. या थकबाकीदारांविरुद्ध इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोडनुसार (आयबीसी) कारवाई करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.