आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील 5 ठिकाणी शिरले डमी दहशतवादी, मॉक ड्रिलमध्‍ये खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- समुद्राच्‍या किना-यावरील सुरक्षेचा आढावा घेण्‍यासाठी मुंबईमध्‍ये 17-18 मे रोजी 'ऑपरेशन सागर कवच' ही मोहिम राबवण्‍यात आली. दरम्‍यान, सुरक्षेमध्‍ये होत असलेली मोठी चूक समोर आली. 6 डमी दहशतवाद्यांपैकी 5 जण विविध लोकेशनहून शहरात शिरण्‍यास यशस्‍वी झाले. सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, या मुद्द्यावर लवकरच चीफ सेक्रेटरी एक उच्‍च स्‍तरीय बैठक घेणार आहेत. तटरक्षक बनले दहशतवादी..
- ही एक बाय-एनुअल मॉक एक्सरसाइज होती.
- 26 नोव्‍हेंबर, 2008 ला झालेल्‍या मुंबई अटॅकनंतर ही सिक्युरिटी ड्रिल सुरू करण्‍यात आली.
- यावेळीही या प्रात्‍यक्षिकामध्‍ये नौदल, तटरक्षक आणि पोलिसांनी सहभाग घेतला होता.
- यामध्‍ये तटरक्षक जवान दहशतवाद्यांच्‍या भूमिकेत होते.
- ते शहरातील 5 विविध ठिकाणी शिरण्‍यास यशस्‍वी ठरले आहेत.
असे होते मिशन, असे आत शिरले 'दहशतवादी'
- दहशतवाद्याच्‍या भूमिकेत असलेल्‍या तटरक्षक जवानांना रेड फोर्स नाव दिले होते.
- कोस्टल पोलिसांच्‍या तुकडीला ब्लू फोर्स असे नाव देण्‍यात आले होते.
- "रेड फोर्सला नावेतून स्‍फोटकांचे बॉक्स घेऊन मुंबईतील अज्ञातस्‍थळी पोहोचायचे होते."
- "रेड फोर्सला मुंबई पोलिसांच्‍या कोस्टल विंगच्‍या डोळ्यात धुळफेक करत ही कामगिरी करायची होती."
- "ब्लू फोर्स त्‍यांचा हा प्रयत्‍न हाणून पाडेल अशी आशा होती."
- "मात्र 6 पैकी 5 दहशतवादी शहरातील विविध पाच ठिकाणी शस्‍त्रसाठा घेऊन पोहोचण्‍यास यशस्‍वी ठरले."
ही झाली सर्वात मोठी चूक
- सुत्रांचा दावा आहे की, ज्‍या लोकेशनहून तटरक्षक दलाचे जवान शहरात शिरण्‍यास यशस्‍वी ठरले, त्‍यातील एक लोकेशन बाधवर पार्क (दक्षिण मुंबई) होते.
- हा तोच मार्ग आहे. ज्‍या मार्गाव्‍दारे कसाब व इतर 9 दहशतवादी 2008 मध्‍ये शहरात शिरले होते.
- मागील वर्षीही याच प्रयोगात डमी दहशतवादी 5 ठिकाणांहून शहरात शिरले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मोहिमेशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...