आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion Poll And Survey Show BJP shivsena Huge Gain In Maharashtra

SURVEY: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा उडणार, काँग्रेसला 8 तर राष्ट्रवादीला 5 जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशात मोदींची लहर आहे की नाही यावर चर्चा झडत असतानाच महाराष्ट्रात मात्र भाजप व शिवसेनेच्या महायुतीला जोरदार यश मिळणार असल्याचे एबीपी न्यूज-नेलसनच्या सर्वेत म्हटले आहे. या सर्वेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातही मोदी लाट असल्याचे स्पष्ट होत आहे. एनडीएला 39 टक्के मतांसह 31 जागा तर यूपीएला 29 टक्के मतांसह 13 जागा मिळण्याचा अनुमान काढला आहे. राज्यात भाजप आतापर्यंत सर्वात जास्त 19 जागा जिंकेल असे म्हटले आहे. याचबरोबर भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेनाही त्याखालोखाल 12 जागांवर विजयी होईल. इतर पक्ष व अपक्ष 4 ठिकाणी (यात मनसेला 1, स्वाभिमानी शेतकरी संघटना 2 आणि 1 अपक्ष) विजयी होतील असे अनुमान काढले आहे. आम आदमी पक्षाला महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नसल्याचे दाखविण्यात आले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा राज्यात धुव्वा उडेल व आतापर्यंत सर्वांधिक कमी जागा जिंकण्याची नामुष्की ओढावेल असे सर्वेत दिसून येत आहे. काँग्रेस 8 तर राष्ट्रवादी 5 जागांवर जिंकेल असे सर्वेत नमूद केले आहे.
राज्यात भाजपला ना भुतो ना भविष्यता असे मिळेल असे सर्वेत म्हटले आहे. भाजपला यंदा 24 टक्के मतांसह 19 जागा मिळतील. 2009 साली भाजपने 18 टक्के मते घेत 9 जागा जिंकल्या होत्या. मोदी लाटेमुळे राज्यात भाजपच्या मतात यंदा 6 टक्के वाढ होत असल्याचे सर्वेक्षण सांगते आहे. भाजपने महाराष्ट्रात 1996 मध्ये सर्वाधिक 18 जागा जिंकल्या होत्या.
या सर्वेनुसार, शिवसेना 15 टक्के मतांसह 12 जागा जिंकेल. 2009 साली शिवसेनेने 17 टक्के मते घेत 11 जागा जिंकल्या होत्या. मात्र, सर्वेनुसार सेनेच्या मतात 2 टक्के घट होईल मात्र एक 1 जागा वाढेल असा विरोधभास दाखविला आहे.
काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत 15 टक्के मते मिळतील तर केवळ 8 जागा जिंकण्यात यश येईल. 2009 साली काँग्रेसने 20 टक्के मतांसह सर्वांधिक 17 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादीला 14 टक्के मतांसह फक्त 5 जागा मिळतील. 2009 साली राष्ट्रवादीला 18 टक्के मतांसह 8 जागा जिंकण्यात यश आले होते.
मनसेला यंदा 6 टक्के मतांसह 1 जागा मिळेल असे सर्वेत म्हटले आहे. 2009 साली मनसेला 4 टक्के मते मिळाली होती व एकही जागा जिंकता आली नव्हती. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला महाराष्ट्रात 4 टक्के मते मिळतील मात्र एकही जागा जिंकता येणार नाही असे सर्वेत नमूद करण्यात आले आहे. 3 जागांवर इतर पक्ष विजयी होतील व सुमारे 22 टक्के मते खेचण्यात त्यांना यश मिळेल असे सर्वे सांगतो. 2009 साली इतर पक्षांचे तीन खासदार निवडून आले होते. तर 21 टक्के मते खेचली होती.
राज्यातील पक्षांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, वाचा पुढे...