आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oposition Leader Says Pankaja Pankaja Yes Papa, Eating Chikki Yes Papa

‘पंकजा पंकजा येस पापा, इटिंग चिकी येस पापा’, विडंबन गीतावर पंकजा नाराज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी साेमवारी विराेधी पक्षाच्या सदस्यांनी शेतकरी प्रश्नावर सरकारविराेधात अाक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले. कर्जमाफीच्या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारिवरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांना सभागृहात प्रवेश करण्यापासून अडवण्याचाही प्रयत्न केला. तसेच वादग्रस्त मंत्री पंकजा मुंडे, विनाेद तावडे यांच्याविराेधातही जाेरदार घाेषणाबाजी करण्यात अाली.

िवरोधी सदस्यांनी ‘पंकजा पंकजा येस पापा, इटिंग चिकी येस पापा’, ‘विनोद विनोद येस पापा, बोगस डिग्री येस पापा’, ‘लोणीकर लोणीकर येस पापा, दोन बायका हा हा हा’, असे विडंबन गीत विरोधक गात होते. िवधिमंडळात काढलेल्या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, लोकभारती, माकप, पीआरपी आदी छोट्या मोठ्या पक्षांचे सदस्य नेते झाडून हजर होते. फेरीच्या अग्रस्थानी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार होते. िवरोधी पक्षनेते राधाकृष्ण िवखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील आदींचा सहभाग होता.

पंकजांची नाराजी : दरम्यान, या विडंबन गीतावर मंत्री पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. मी माझ्या वडिलांना गमावले अाहे त्यामुळे विराेधकांनी ‘पापा’चा (वडिलांचा) उल्लेख करायला नकाे हाेता, अशी भावना त्यांनी माध्यमांकडे बाेलून दाखवली.