आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेत गोंधळ: कर्जमाफीसाठी सरकार अनुकूल,श्रेयासाठी भाजपही सरसावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विरोधक व शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी आक्रमकपणे लावून धरल्यामुळे  आणि कर्जमाफी देण्यासाठी सरकारही अनुकूल दिसू लागल्यामुळे या मुद्यावर भाजपनेही मैदानात उडी घेतली. कर्जमाफीवर विधानसभेत गुरुवारी पुन्हा गोंधळ झाला. कामकाज सुरू होताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. विशेष म्हणजे विरोधकांच्या सुरात सूर मिसळत सत्ताधारी भाजप आमदारांनीही अध्यक्षांच्या समोरच्या हौद्यात व आसनासमोर धाव घेत कर्जमाफीची मागणी केली.

सभागृहाची मागणी असताना सरकार कर्जमाफी का देत नाही, असा प्रश्न विचारला जात होता. तसेच इतके दिवस गप्प बसलेले भाजप आमदार अचानक कर्जमाफीच्या बाजूने एवढे आक्रमक का झाले, याचेही अनेकांना कोडे पडले. बुधवारी विरोधक व शिवसेना आमदारांनी सरकारला धारेवर धरले होते. कर्जमाफी दिल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही असा पवित्रा या आमदारांनी घेतला होता. त्याचाच प्रत्यय गुरुवारीही आला. सभागृहात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांचे सदस्य शेतकरी कर्जमाफीसाठी एकत्र आल्याचे चित्र दिसले. गुरुवारी फरक एवढाच होता की चक्क भाजप सदस्यांनीही विरोधकांना साथ दिली.

पुन्हा कामकाज सुरु झाले ते सदस्यांच्या कर्जमाफीच्या घोषणांनीच. भाजप व शिवसेना या सत्ताधारी आमदारांसोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य विरोधी पक्ष सदस्यांनी शेतक-यांना कर्जमाफी मिळावी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणा देत अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत सर्वच सदस्यांनी धाव घेतली तर काही सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेतली. शिवसेना सदस्यांनी शेतक-यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे, शेतक-यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे असे लिहिलेले फलक सभागृहात फडकवले. तेव्हा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी फलक सभागृहाबाहेर नेण्याचे निर्देश शिवेसना सदस्यांना दिले. गोंधळामुळे अध्यक्षांना दुस-यांदा सभागृहाचे कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केले. 
 
शिवसेनाही आक्रमक,विखेंनी दिला इशारा
शिवसेना सदस्यांनी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा-शेतकऱ्यांचा सातबारा  कोरा, कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत सदस्य जमले. गोंधळातच विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी कर्जमाफीशिवाय कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा दिला. गोंधळामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.
 
सर्वांचीच इच्छा, मग उशीर का होतोय?
राधाकृष्ण विखे पाटील सभागृहात म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. यावर चर्चा व्हावी. कामकाज बाजूला ठेवून कर्जमाफीची घोषणा सरकारने करावी.सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी शेतकरी कर्जमाफी करावी, अशी घोषणाबाजी सुरुच ठेवली त्यामुळे अध्यक्षांनी १५ मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करत असल्याची घोषणा केली.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, आमदार परिचारकांचे दीड वर्षासाठी निलंबन...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...